Nashik ZP Transfer : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांची तडकाफडकी अहमदनगरला बदली झाली आहे. सात महिन्यांपूर्वीच ते माध्यमिकला रुजू झाले होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना त्यांची बदली झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या सुपर फिफ्टी अभिनव उपक्रम राबविताना पाटील यांना दूर ठेवण्यात आले होते. त्या वेळी प्रशासनाकडून त्यांची थेट लेखी तक्रार करण्यात आल्याचे बोलले जात होते.
यातच, पालकमंत्री दादा भुसे यांनी पाटील यांच्या कामकाजाविषयी तक्रारी केल्याचे समजते. त्यामुळेच पाटील यांची बदली झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. (Praveen Patil Secondary Education Officer in zp transferred to Ahmednagar nashik zp transfer news)
तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यावर लाचलुचपत विभागाने कार्यवाही केल्याने हे पद रिक्त होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये या पदावर धुळे येथून प्रवीण पाटील यांची बदली झाली होती. पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाच्या कामकाजावर लावण्यात आलेला शिक्का पुसण्याचा प्रयत्न करीत काम केले.
याला यशही मिळाले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी रुजू झाल्यावर सुपर फिफ्टी हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. माध्यमिक विभागाकडून हा उपक्रम राबविला गेला. यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षातही सुपर ११० हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्यास निधीही उपलब्ध झाला.
मात्र, माध्यमिक विभागाकडून विशेष शिक्षणाधिकारी यांच्याकडून उपक्रमाबाबत योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच, यावरून श्रीमती मित्तल व पाटील यांच्यात खडाजंगीही झाल्याची चर्चा त्या वेळी होती. त्यानंतर श्रीमती मित्तल यांना हा उपक्रम राबविताना पाटील यांना दूर ठेवत, याचा कार्यभार समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्या समितीकडे सोपविला.
या समितीत माध्यमिक शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले. मात्र, पाटील यांना बाजूला ठेवण्यात आले. त्या वेळी श्रीमती मित्तल यांनी पाटील यांच्या कामकाजाविषयी थेट शिक्षण विभागाकडे तक्रार केल्याची चर्चा होती. असे असताना पालकमंत्री भुसे यांच्याकडूनही पाटील यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
त्यांच्याकडूनही तक्रार झाल्याचे सांगितले जात आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीतही पाटील यांना खडेबोल सुनावत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळेच पाटील यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोरदरच त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पाटील यांच्या रिक्त जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.