आज ना उद्या घोलप आमच्या सोबत येतील : प्रविण तिदमे

Pravin Tidme Statement over Baban Gholap
Pravin Tidme Statement over Baban Gholapesakal
Updated on

नाशिक : म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी प्रवीण तिदमे यांचीच नोकरी वाचविण्यासाठी मला प्रयत्न करावे लागले. असा दावा करणारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप हे आज न उद्या आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या सोबत असतील असा दावा शिंदे गटाचे महानगरप्रमुख तिदमे यांनी करत शिवसेनेच्या पायात साप सोडण्याचा प्रयत्न केला. (Pravin Tidme statement about Babanrao Gholap nashik Latest Political News)

Pravin Tidme Statement over Baban Gholap
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई : CM एकनाथ शिंदे

तिदमे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बबन घोलप यांनी सुधाकर बडगुजर यांच्याऐवजी एखाद्या कामगाराची नियुक्ती केली असती किंवा अन्य नगरसेवकाला संधी दिली असती तर म्युनिसिपल कर्मचारी सेनेवरचा दावा आम्ही सोडलाही असता. घोलप हे वरिष्ठ नेते आहेत.

माजी आमदार योगेश घोलप यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्यासमोर विधानसभेची उमेदवारी करायची तर त्यांनाही महाविकास आघाडी समोर अन्य पक्षात प्रवेश घ्यावा लागू शकतो. बबन घोलप, योगेश घोलप हे आमच्या सोबत आले तर त्यांच्या अनुभवाचा पक्ष वाढीसाठी निश्चितच लाभ होईल. त्यामुळेच आम्ही घोलप यांना विरोध न करण्याचे ठरविले होते.

मात्र, ज्यांच्यामुळे सामान्य सैनिक त्रस्त आहेत, जे आमच्या मागून पक्षात आले आणि आज हुकूमशहा बनले. त्यांनाच तुम्ही म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद देणे अयोग्य आहे. त्या पदाचा फायदा कामगारांना न मिळता स्वतःसाठीच अधिक होण्याचा धोका अधिक आहे. महानगरप्रमुख पद स्वतःकडे असताना म्युनिसिपल सेनेचे ही अध्यक्षपद स्वतःकडे घेऊन एकाधिकारशाहीचा प्रयत्न होतोय. घोलप यांनी अन्य कोणाचा अध्यक्षपदासाठी विचार केल्यास आम्हीही संघटनेवरचा दावा सोडला असता. कारण, आज ना उद्या घोलप मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासोबत असतील, याची आम्हाला खात्री आहे. असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

Pravin Tidme Statement over Baban Gholap
स्वामीनारायण मंदिर भविष्यातील नाशिकचे पवित्र तीर्थस्थळ : CM एकनाथ शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()