Pre Exam Training : विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी परीक्षेपूर्व प्रशिक्षण; 5 जुलैपर्यंत करा अर्ज

student
studentsakal
Updated on

Pre Exam Training : एमएचटी सेट, जीईइ नेट २०२५ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सरकारतर्फे पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Pre examination training for students nashik news)

५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. महाज्योतीच्या माध्यमातून ऑनलाइन पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि प्रतिदिन ६ जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या योजनेचा लाभ इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष तन्वीर तांबोळी यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

student
MPSC Non Gazetted Exam : अराजपत्रित सेवा परीक्षेच्‍या जागांमध्ये वाढ; आता इतक्या जागांवर होणार भरती

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर लागू असलेल्या गुणपत्रिका आणि जोडलेली सर्व कागदपत्रे महाज्योतीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्जासोबत जोडता येणार आहे. małajyotijeeneet24@gmail.com या ई-मेल आयडीच वापर अर्जासाठी करता येणार आहे, असे श्री. तांबोळी यांनी सांगितले.

student
Competition Exam : तरुणींनो, स्पर्धा परीक्षांचा बाऊ कशाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.