चांदवडला मॉन्सूनपूर्व पाऊस; विजेचा खांब कोसळला

storm & rain Hits electricity poll
storm & rain Hits electricity pollesakal
Updated on

रेडगाव खुर्द (जि. नाशिक) : चांदवडला बुधवारी (ता. १) मॉन्सूनपूर्व पावसाने (Pre Monsoon Rain) हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाच्या आशा काहीअंशी पल्लवित झाल्या. या पावसामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) शेतीकामांना खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. (pre monsoon rains hits in Chandwad Nashik News)

बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत दमट वातावरण होते. त्यानंतर ढगांची गर्दी झाली. सायंकाळी चारला विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. काही वेळानंतर सोसाट्याचा वाराही सुटला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. यामुळे रेडगाव खुर्द गावच्या परिसरातील वीजपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली.

storm & rain Hits electricity poll
Art- Culture : नाशिकच्या तरुणांचे मुंबईत चित्रप्रदर्शन

दोन महिन्यांपासून तापमान प्रचंड वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. आजच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व मशागतीसाठी हा पाऊस काहीअंशी उपयोगी ठरला. चांदवड शहरासह तालुक्यातील काजीसांगवी, सोनीसांगवी पन्हाळे आदी गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोबकळल्या असून काही ठिकाणी खांब कोसळल्याच्या घटनाही घडल्या.

storm & rain Hits electricity poll
दहिवड व धोबीघाट परिसरात पावसाळ्याचा पहिल्या पावसाची हजेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.