Nashik : चर्चा प्री- वेडिंग शूट हवे की नकोची!

pre wedding photo shoot
pre wedding photo shootesakal
Updated on

नैताळे (जि. नाशिक) : पाश्‍चिमात्य (Western) देशातून हळूहळू आपल्या देशात नव्हे आता ग्रामीण भागातही पाय पसरलेल्या प्री-वेडिंग शूटने (Pre wedding Shoot) लग्नाआधी एक वेगळाच उत्साह संचारत आहे. प्री-वेडिंग शूट म्हणजे आपल्या सुखद आठवणींचा एक कधीही न विसरता येणारा कप्पा अशी समजूत यामागे असली तरी ही फॅशन आता ग्रामीण भागातही चांगलीच रूळू पाहत आहे. आर्थिकस्थिती चांगली असलेले त्यासाठी सहज खर्च करीत असले तरी मुलांचा आनंद असे गोंडस नावही त्याला दिले जात आहे. मात्र अलिकडेच या शूटप्रसंगी घडलेल्या प्रकारातून थेट लग्नच मोडल्याचा प्रसंग नागपुरात घडला आहे, त्यामुळे लग्नाआधी मुलामुलींना असे एकटे जाऊ द्यावे का हा प्रश्‍न चर्चेला आला आहे. प्रत्येक पालकाने याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज समाजसेवींनी व्यक्त केली आहे. (pre wedding shoot trending nowadays Nashik News)

बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळ्याच्या प्रक्रियेतील लोक घरातील सजावट सुंदर दिसावी म्हणून आपल्या घराच्या छोट्या हॉलमध्ये इतके दिवे लावले जातात, की आपल्याला इतक्या दिव्याची आवश्यकता सुद्धा नसते. इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यानी श्रीमंत लोकांना काही नवीन कार्यक्रम सांगण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट सुरू केले जाते. लग्नासारख्या पवित्र सोहळ्यात अशा प्री वेडिंग शूटसारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वधू-वर आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाआधी छायाचित्रकारांचा एक ग्रुप घेऊन सुंदर लोकेशनला फोटोशूट करून घेतात.

अनेक फोटो असे काढले जातात, की वधू आणि वर एकमेकांच्या मिठीत असतात. कधी कधी नववधू किमान (छोट्या) पोशाखात पण दिसतात. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नापूर्वी असा मोकळेपणा मान्य नाही. ही पाश्चात्य संस्कृती आहे असे काही लोकांची मानसिकता आहे. या फोटोशूटसाठी १ ते ५ लाख रुपये खर्च येतो. या फोटोशूटला परवानगी देणारे पैसे आमचे आहेत, मुलांच्या आनंदासाठी ५ लाख रुपये खर्च केले तर चुकीचे काय? असा युक्तिवाद करतात. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी हे फोटोशूट करू नये पण आमच्याकडे पैसा आहे आम्हाला ते का करू देत नाही..0 असे प्रश्न प्री विडिंग ला परवानगी देणारे नव वधूवर पालक करत असतात.

pre wedding photo shoot
Nashik : मानूर, आश्रम पाडा परिसरात मोबाईल नेटवर्क रेंजचा बोजवारा

मुलांच्या सुखासाठी माणूस सर्व काही करतो. पण कोणतीही घटना योग्य की अयोग्य, त्याचे समाजावर काय परिणाम होतात हे ठरवले जाते. प्री-वेडिंग फोटोशूटमुळे अनेक विवाह तुटत असल्याचे ऐकले आहेत. मुलांच्या आनंदासाठी, ज्यांच्याकडे इतके पैसे नाहीत, ते कर्ज घेऊनही हे फोटोशूट करून घेत असतात. त्यामुळे लग्नाच्या खर्चाबाबत आधीच टेन्शनमध्ये जगणाऱ्या सर्वसामान्यांचा ताण वाढत आहे. लग्नात पूर्वीपासूनच इतके कार्यक्रम असतात, की ज्याच्या तयारीसाठी हळद कुंकूपासून ते पाहुण्यांच्या निरोपापर्यंत घरातील मंडळींना आजीची आठवण येते.

pre wedding photo shoot
Nashik : आता वाढदिवस साजरा होता फेसबुक अन व्हाटसअपवर!

एकीकडे समाजसुधारक लग्नाचा खर्च कसा कमी करता येईल याचा सखोल विचार करत आहेत. त्यासाठी लग्नात दिल्या जाणाऱ्या जेवणातील खाद्यपदार्थांची संख्या कमी करत आहेत. लग्नात काटकसर करून मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना लग्नाच्या अनावश्यक खर्चाच्या तणावातून मुक्तता मिळत असते. दुसरीकडे एक वर्ग अशा चुकीच्या प्रथांना चालना देत आहेत. वधू- वर पालकानी यावर विचार मंथन करण्यास हरकत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.