मनमोकळं : सर्वांगीण विकासासाठी ‘स्केटिंग’ खेळास प्राधान्य द्या

Amol Sathe
Amol Satheesakal
Updated on

"स्केटिंग या खेळ प्रकारात मानसिक आणि शारीरिक असा दुहेरी विकास होतो. शरीराचा प्रत्येक स्नायू यामुळे बळकट होतात. स्केटिंग करत असताना वेग वाढविणे, कमी करणे, तसेच स्वतःवर नियंत्रण करणे, योग्य निर्णय घेण्याची क्षमता लहान मुलांमध्ये लवकर विकसित होते. या खेळाच्या माध्यमातून शिस्त भावना निर्माण होते. लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी स्केटिंग या खेळास प्राधान्य द्यावे, असे मत चँपियन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे संस्थापक तथा स्केटिंग प्रशिक्षक अमोल साठे यांनी व्यक्त केले."- निखिलकुमार रोकडे

(Prefer sport of Skating for all round development interview of amol sathe nashik news)

- चँपियन स्पोर्ट्स ॲकॅडमीबद्दल सांगा?

अमोल साठे : माझे शिक्षण डिप्लोमा इलेक्ट्रिकल ॲन्ड टेलिकम्युनिकेशनमधून झाले आहे. मला सुरवातीपासूनच खेळांची आवड होती. मला अनेक प्रकारचे खेळ खेळता येतात. हॉटव्हील्स स्केटिंग क्लब नाशिक रोड येथून चार वर्षांच्या स्केटिंगचे मी ट्रेनिंग पूर्ण केले.

२०१८ चँपियन स्पोर्ट्स ॲकॅडमी या नावाने स्वतःची संस्था सुरू केली व स्केटिंगसाठी पूर्णवेळ लहान मुलांना ट्रेनिंग देत आहे. राज राजराजेश्वरी मंगल कार्यालय (जेल रोड) व क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूल येथे स्केटिंगचे ट्रेनिंग मी देत आहे.

आतापर्यंत जवळपास एक हजार लहान मुलांना ट्रेनिंग दिलेले आहे. आमच्या ॲकॅडमीमार्फत १५० हून अधिक मुलांनी जिल्हा व राज्य पातळीवर विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.

- स्केटिंग या खेळाबद्दल सांगा?

अमोल साठे : बर्फाच्छादित प्रदेशात प्राचीन काळी लोक बर्फावर इकडून-तिकडे जाण्यासाठी काठीने घसरत जायचे. यातूनच स्केटिंग या खेळाची निर्मिती झाली. चौदाव्या व पंधराव्या शतकात स्केटिंग हा खेळ लोकप्रिय झाला.

सुरवातीच्या काळात स्केटिंग हा खेळ बर्फाच्छादित प्रदेशात थंडीच्या मोसमातच खेळला जायचा. परंतु कालांतराने स्केटिंगसाठी पहिले कृत्रिम बर्फाचे मैदान १८७६ व १८७९ लंडन व न्यू यॉर्क येथे बनवविण्यात आले.

त्यामुळे उन्हाळ्यातही स्केटिंग करणे सोपे झाले. कालांतराने आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघाची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षीपासून आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा सुरू करण्यात आल्या. फिगर स्केटिंग हे १९०८ मध्ये ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात आले.

त्यानंतर पुढे १९२४ मध्ये स्पीड स्केटिंगसुद्धा ऑलिंपिक खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आली. सुरवातीच्या काळात फक्त पुरुष सहभाग घेत असत. परंतु १९६० पासून महिलासुद्धा स्केटिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागल्या.

आजच्या घडीला स्केटिंग हाच खेळ सर्वदूर पसरलेला आहे. आपल्या देशातही जवळपास सर्वच ठिकाणी या खेळामध्ये सहभागी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Amol Sathe
मनमोकळं : ‘महावितरण आपलीच’ या भावनेने अनावश्यक वीजवापर टाळा!

- स्केटिंग खेळाचे प्रकार व संधी सांगा?

अमोल साठे : स्केटिंग हा एक ऑलिंपिक खेळ आहे. लहान मुलांना लहानपणापासूनच स्केटिंगचे वेड असते. स्केटिंग हा एक करमणुकीचा खेळ आहे, तसेच स्पर्धात्मक खेळ आहे. स्केटिंग म्हणजे एक व्यक्ती चाकांवर बसवलेल्या लहान बोर्डवर समतोल उभी राहून सायकल चालवते.

स्केटिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की, रोलर स्केटिंग, स्पीड स्केटिंग, फिगर स्केटिंग, आइस स्केटिंग आणि आर्टिस्टिक स्केटिंग इत्यादी. स्केटिंग हा खेळ शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत आहे.

शासनाने निर्देशित केलेल्या नॅशनल लेवलच्या स्पर्धेसाठी पाच टक्के मार्क शालान्त परीक्षेसाठी अतिरिक्त आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्पीड कॅटेगिरी समाविष्ट आहे. तसेच देशभरात अनेक ठिकाणी नियमितपणे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा नियमितपणे होत असतात. यामध्येही अनेक मोठमोठी बक्षीसही दिली जातात.

- मुलांना स्केटिंगचे आकर्षण का आहे?

अमोल साठे : आपल्या घरात अथवा अवतीभवती लहान मुले असतात. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येईल, की लहान मुलांना बाईक, कार अथवा सायकलची चक्कर मारायला आवडते. त्यांना चक्कर देत असताना ते कायम आपणास स्पीड वाढवायला सांगत असतात. त्यांना सुरवातीपासूनच वाहनांचे आकर्षण असते.

त्याहीपेक्षा त्यांना वेग (स्पीड) आवडतो. त्यांची ही आवड स्केटिंग या खेळाच्या माध्यमातून पूर्ण होते. स्केटिंग करत असताना ताशी ४० ते ५० किलोमीटर या स्पीडने स्केटिंग होत असते. त्यामुळे या खेळास अधिक प्राधान्य मिळत आहे.

Amol Sathe
मनमोकळं : व्याज व दंडमुक्तीसाठी वेळेत रिटर्न फाईल भरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.