लासलगाव (जि. नाशिक) : म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पवार यांनी गरोदर अवस्थेतही विष प्राशन केलेल्या तरुणाचे स्वतः ॲम्बुलन्स चालवून प्राण वाचवले.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की प्राथमिक आरोग्य केंद्र माळसाकोरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पवार या मंगळवारी ड्युटीवर असताना सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मांजरगाव येथील 27 वर्षे युवकाने विष प्राशन केलेल्या अवस्थेत त्याला दाखल केले. (pregnant woman doctor saved patients life by driving an ambulance herself Nashik News)
ड्युटीवर असलेला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाला पुढील उपचाराची गरज होती.
प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असून देखील त्याचा चालक रजेवर असल्याने रुग्णाला निफाड येथे उपचारासाठी नेणे गरजेचे होते परंतु डॉक्टर प्रियांका पवार या गरोदर अवस्थेत आहे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रात्री साडेआठ वाजता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेऊन स्वतः रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून स्टेरिंग हातात घेतले रुग्णाचा जीव वाचवणे हाच महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर होता.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
ॲम्बुलन्स चालवायचा अनुभव नसल्याने हळूहळू निफाड ग्रामीण रुग्णालय एक ते सव्वा तासात गाठले. रुग्णाला ताबडतोब पुढील उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचल्याने मनाला समाधान वाटले. या घटनेचे डॉक्टर प्रियांका पवार यांचे परिसरात कौतुक होत आहे.
"नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना मंगळवारी सायंकाळी विष प्राशन केलेल्या रुग्ण दाखल झाला. रुग्णाची तब्येत गंभीर होती त्याचे प्राण वाचवणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते मी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी निफाड येथे नेणे गरजेचे होते माझी परिस्थिती बाजूला ठेवून मी स्वतः रुग्णवाहिकेवर चालक म्हणून सारथी ची भूमिका केली. माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे रुग्णाचे प्राण वाचले हे माझ्या दृष्टीने जीवनातील खूप खूप महत्त्वाचे आहे."
- डॉ. प्रियंका पवार. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.