पोटात बाळ घेऊन कोरोनारुग्णांची सेवा करणारी गर्भवती हिरकणी!

amruta bhujade
amruta bhujadeesakal
Updated on

येवला (जि.नाशिक) : कोरोनाने सगळीच नाती दुरावली...(corona virus) पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळ जायला घरातील लोकच टाळाटाळ करताहेत, तेव्हा इतरांची काय बात. मात्र, अशा दुनियेतही पोटात बाळ (pregnant woman) घेऊन एक हिरकणी गावाची आरोग्यसेवा करतेय. (Pregnant women caring for corona patient)

आई एक खरी योध्दा!

देवळाणे येथील आरोग्य उपकेंद्राच्या महिला कर्मचारी अमृता भुजाडे गर्भवती असतानाही रजेवर न जाता त्यांनी रुग्णसेवेचे व्रत हाती घेतले आहे. प्रत्यक्ष पॉझिटिव्ह रुग्ण समोर असताना जीवाची पर्वा न करता त्यांनी ग्रामस्थांची सेवा केली. लसीकरणासंदर्भात सर्वत्र जनजागृती करून लसीकरण करणे, कोविड चाचण्या करणे, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला व कुटुंबातील सदस्यांचे तापमान तपासणी करणे, त्यांना आधार देणे व बरे होण्यासाठी प्रेरणा देणे अशी अनेक धोकादायक कामे त्यांनी पार पाडली. बोकटे, देवळाणे, दुगलगाव परिसरात त्या आरोग्यसेवा देत राहिल्या. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्याचा प्रस्ताव बोकटेचे सरपंच प्रताप दाभाडे यांनी कोरोना समितीकडे मांडला. त्यानुसार या कर्तृत्ववान महिलेचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणूनच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा ‘कोरोनायोद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला.

amruta bhujade
नाशिकमध्ये वाडा खोदकामात सापडला भुयारी मार्ग! विविध चर्चांना उधाण

पैठणी देऊन सत्कार

बोकटे येथील कोरोना समितीने मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात भुजाडे यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पैठणी देऊन सत्कार केला. तलाठी अश्‍विनी शेंडे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, सरपंच प्रताप दाभाडे, ग्रामसेवक भावराव मोरे, पोलिसपाटील सुरेश दाभाडे, सदस्य अरुण मोरे, संतोष निकम, विलास दाभाडे, विजय दाभाडे, पोपट दाभाडे, अनिल मोरे, बाळासाहेब दाभाडे, सर्जेराब बागल, संदीप साळवे, बाळासाहेब मोरे, प्रसाद मुळे आदी उपस्थित होते.

amruta bhujade
Nashik Lockdown : फळे, भाजी विक्रीच्या वेळेत वाढ; विभागीय अधिकाऱ्यांना आदेश

आपण या अडचणीत समाजाचे काहीतरी देणे लागतो, म्हणून कर्तव्य करणे हीच खरी सेवा होऊ शकते. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर पदाधिकाऱ्यांना या संकटकाळी आपले कार्य सिद्ध करण्याची खरी वेळ आली आहे. बोकटे, देवळाणे, दुगलगावची परिस्थिती खूप गंभीर होती. सर्वांच्या सहकार्याने गावात आता बरी परिस्थिती आहे. - प्रताप दाभाडे, सरपंच, बोकटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.