Shivpratap- Garudjhep : शिवरायांच्या जयघोषात ‘शिवप्रताप - गरुडझेप’चा Premier

Dr. Amol Kolhe & Chhagan Bhujbal
Dr. Amol Kolhe & Chhagan Bhujbalesakal
Updated on

नाशिक : मुघल सम्राट औरंगजेब याची भेट घेण्यासाठी गेलेल्या छत्रपती शिवरायांना कट-कारस्थानाने नजरकैद केल्यानंतर यातून शिवरायांनी मोठ्या चतुराईने करून घेतलेल्या सुटकेचा चित्तथरारक व रोमांचकारी अनुभव ‘शिवप्रताप - गरुडझेप’च्या माध्यमातून नाशिककरांनी शनिवारी (ता.१) सायंकाळी घेतला. शिवरायांचा जयघोष आणि दुसरीकडे शिवरायांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये ‘शिवप्रताप - गरुडझेप’ या मराठी चित्रपटाचा प्रिमिअर पार पडला. (Premier of Shivapratap Garudzep Marathi movie at City Center Mall nashik Latest Marathi News)

Dr. Amol Kolhe & Chhagan Bhujbal
Shardiya Navratri 2022 : गरबा दांडियाचा उत्साह; पाहा PHOTOS

उंटवाडी रोडवरील नाशिक सीटी सेंटर मॉलमधील पीव्हीआर सिनेमागृहात शनिवारी (ता. १) सायंकाळी अभिनेते अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘शिवप्रताप - गरुडझेप’ या मराठी ऐतिहासिक चित्रपटाचा प्रिमिअर शो चे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सपकाळ नॉलेज हबचे रवींद्र सपकाळ, कल्याणी सपकाळ आदींनी चित्रपटांचा आनंद घेतला.

चित्रपट पाहण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह डॉ. शेफाली भुजबळ व कुटुंबीयांनी हजेरी लावली. या वेळी भुजबळ यांनी चित्रपट पाहण्यासाठी शिवरायांच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्याशी गप्पा मारल्या. तर, प्रिमिअर शोसाठी आलेले व चित्रपटातील प्रमुख अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येताच भुजबळ यांचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेतले. तर, सिनेमागृहातही प्रेक्षकांची खच्चून गर्दी झाली होती.

Dr. Amol Kolhe & Chhagan Bhujbal
Nashik : निफाड तालुक्यात 21 कुष्ठरुग्ण अन् 20 क्षयरोगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.