News Year 2024 : मालेगावमध्ये नवीन वर्षाच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी; शेतमळ्यांमध्येही ‘पार्टी’

मालेगाव शहर व परिसरात नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. कोरोनानंतर निर्बंधाशिवाय ‘थर्टी फर्स्ट’ आणि नवीन वर्षाचे स्वागत यंदा उत्साहात केले जाणार आहे.
Hotel New Sukhsagar on the highway is all set to welcome the New Year.
Hotel New Sukhsagar on the highway is all set to welcome the New Year.esakal
Updated on

News Year 2024 : मालेगाव शहर व परिसरात नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. कोरोनानंतर निर्बंधाशिवाय ‘थर्टी फर्स्ट’ आणि नवीन वर्षाचे स्वागत यंदा उत्साहात केले जाणार आहे. दुष्काळी परिस्थिती असली, तरी विशेषतः तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शहरातील हॉटेल, धाब्यांवरील ‘बुकिंग’ ‘हाउसफुल्ल’ झाले आहेत.(preparations to welcome of New Year in Malegaon nashik news)

अनेकांनी शेतमळ्यांमध्ये ‘पार्टी करण्याची तयारी सुरु केली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर विविध कार्यक्रम होणार आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांचे विशेष लक्ष असेल. दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जणांचे पर्यटन व देवदर्शनाचे नियोजन झाले आहे.

कोरोनानंतर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. कुटुंब, मित्रपरिवार, जवळचे नातेवाईक एकत्रित निवास आणि भोजनासाठी वेळ देण्यास प्राधान्य देत आहेत. त्यातही शहरी भागातील हॉटेल, रिसॉर्टच्या झगमगाटाऐवजी शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणावर जाण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

त्यामुळे शहरापासून दूर असलेले फार्महाउस, रेस्टॉरंट, हॉटेलला अधिक पसंती मिळत आहे. शहरातील अनेक जण सामाजिक कार्यक्रम राबवीत नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. शहर व परिसरातील हॉटेल ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोषणाई व स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

Hotel New Sukhsagar on the highway is all set to welcome the New Year.
New Year Resolution 2024 : नवीन वर्षात स्वतःसाठी करा हे संकल्प, चैतन्य आणि आनंदाने भरून जाईल आयुष्य

नवीन वर्षाची सुरवात देवदर्शन व पर्यटनाने अनेक कुटुंबीय करतात. कोकण किनारपट्टीवरील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, गड-किल्ले आदींना प्राधान्य दिले जात आहे. याशिवाय श्री सप्तशृंगगड, शिर्डी, शनी शिंगणापूर, जेजुरी, शेगाव, त्र्यंबकेश्‍वर, अष्टविनायक आदी ठिकाणी दर्शनाचे नियोजन करण्यात येत आहे.

''नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये संगीत व विविध गाण्यांच्या कार्यक्रम होतील. विविध नवीन पदार्थांची मेजवानी नवीन वर्षात ग्राहकांच्या सेवेत असेल. हॉटेल व परिसरात सजावट करण्यात आली असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही तयारी केली आहे.''- नानाभाऊ वाघ, संचालक, हॉटेल, न्यू सुखसागर

''सामाजिक बांधिलकी जोपासत शिलेदार फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवीत नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे. फाउंडेशनचे सदस्य गरजू व गरीब लोकांसोबत ३१ डिसेंबर साजरा करणार आहे.''- कैलास बच्छाव, अध्यक्ष, शिलेदार फाउंडेशन

Hotel New Sukhsagar on the highway is all set to welcome the New Year.
New Year 2024 : सरत्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्‍ज; हॉटेल व्‍यवस्‍थापनाकडून जय्यत तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()