कोरोना महामारीचे सोंग घेतलेल्या शिक्षण विभागाला अखेर जाग

education department
education departmentesakal
Updated on

नाशिक : राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण (online education) देणारा शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षण सेवेत एकूण किती शिक्षक पीएच.डी.(PH.d) प्राप्त आहेत याबाबत ऑफलाइन असल्याचे ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. कोरोना महामारीचे सोंग घेतलेल्या शिक्षण विभागाला विधानसभा सदस्य संभाजी पाटील-निलंगेकर(Assembly member Sambhaji Patil-Nilangekar) यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित करून जाग आणली आहे. (presented-starred-questions-about-Department-of-Education)

विधानसभा सदस्य संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडून तारांकित प्रश्‍न उपस्थित

महाराष्ट्र शासनातील शिक्षण विभागात केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी या पदापर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत. फार पूर्वीच्या शासननिर्णयानुसार बी.एड. झालेल्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख ते शिक्षण अधिकारी या पदांची संधी मिळत असते. मात्र शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी विद्यावाचस्पती तथा पीएच.डी. पदवी असणाऱ्या शिक्षकांना कुठली पदोन्नती नाही किंवा कुठली शासकीय दखल ही घेतली जात नाही. वास्तविक शासनाला या उच्चशिक्षित शिक्षकाकरिता कुठलेही कष्ट घ्यावे लागले नाहीत. परदेशातील शिक्षण विभाग त्या त्या देशात प्राथमिक शिक्षण व शिक्षकाला अद्ययावत शिक्षित करण्यासाठी विविध पदोन्नत्या देऊन त्यांचे आत्मबल वाढवीत असतो. या सकारात्मक बाबीचा विचार करून राज्य शासनाने आता या रिक्त पदांवर जर याच शिक्षकांना संधी दिली तर शासनाला कुठलाही आर्थिक भार पडणार नाही. त्याच शिक्षकांमधून सेवाज्येष्ठ पीएच.डी.नुसार संधी दिली तर अतिरिक्त शिक्षक सामावून घेण्यासही मदत होईल. मागील सरकारने जाता जाता सर्व पीएच.डी.प्राप्त शिक्षकांची शाळास्तरावरून माहिती मागविली होती, मात्र सरकार बदलले आणि प्राप्त माहिती केराच्या टोपलीत गेली की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात ‘सकाळ’ने जाग आणण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीची सबब पुढे करीत शिक्षण विभागाने वेळ मारून नेली. मात्र, हाच मुद्दा लक्षात घेत विधानसभा सदस्य संभाजी-पाटील निलंगेकर यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित करीत शिक्षण विभागाला राज्यभरातून तातडीने माहिती मागविण्यास भाग पाडले आहे. दोन दिवस होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्‍न तडीस लागून रिक्त वर्ग १ व २ च्या पदांवर या उच्च शिक्षित शिक्षकांच्या पदोन्नतीने नियुक्त होतील, अशी आशा आहे.

education department
कोरोनाच्या भितीने फार्महाउसवर गेलेल्या नगरसेवकांना आर्त हाक
education department
नाशिकमध्ये लसीसाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.