Dr. S. B. Pandit Passed Away: गोखले एज्‍युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. बी. पंडित यांचे निधन

Dr SB Pandit
Dr SB Panditesakal
Updated on

नाशिक : गोखले एज्‍युकेशन सोसायटी संस्‍थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. पंडित (वय ९५) यांचे सोमवारी (ता. ११) सायंकाळी ७.२० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. ते १९९८ पासून संस्‍थेच्‍या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते.

मंगळवारी (ता. १२) सकाळी अकराला पंचवटी अमरधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत. (President of Gokhale Education Society Dr SB Pandit passed away nashik)

डॉ. श्रीनारायण बाळकृष्ण पंडित अर्थात, एस. बी. पंडित यांनी वाणिज्‍य शाखेतून नागपूर विद्यापीठ येथून पदवी व पदव्‍युत्तर पदवी शिक्षण घेतले. यानंतरही वेळोवेळी देश-विदेशातील विविध शैक्षणिक संस्‍थांतून त्‍यांनी अध्ययन केले.

शिक्षण क्षेत्रात योगदान देताना त्‍यांनी अनेक वर्षे अध्ययनातून हजारो विद्यार्थी घडविले. गोखले एज्‍युकेशन सोसायटीसोबत जोडले जाताना त्‍यांनी नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाचे १९७३ ते १९८८ यादरम्‍यान प्राचार्यपद भूषविले.

यानंतर जेडीसी बिटको इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्‍टडीज ॲन्ड रिसर्चचे संचालकपद भूषविले. तर १९९८ पासून ते संस्‍थेच्‍या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. संस्‍थेच्‍या विश्‍वस्‍त मंडळाच्‍या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी ते सांभाळत होते.

Dr SB Pandit
NMC News: मनपा शिक्षकांना आजपासून प्रशिक्षण

त्‍यांनी आजवर विविध विषयांवर अकरा पुस्‍तकांचे लिखाण केले. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना इंडियन असोसिएशन फॉर मॅनेजमेंट डेव्‍हलपमेंटचे सचिवपद, तसेच इंटरयुनिव्‍हर्सिटी कौन्‍सिल ऑफ बिझनेस एज्‍युकेशन ॲन्ड रिचर्सचेही नेतृत्व केले.

पुणे विद्यापीठात वाणिज्‍य शाखेच्‍या अभ्यास मंडळाचे सदस्‍य तसेच अधिसभा सदस्‍यपद, ॲकॅडमिक कौन्‍सिलचेही सदस्‍यपद त्‍यांनी भूषविले होते. त्‍यांच्‍यामागे तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Dr SB Pandit
Sushma Andhare News: पालकमंत्री दादा भुसेंनी लपविले ड्रग्जप्रकरण : सुषमा अंधारे यांची टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.