Nashik : घंटागाडी निविदा प्रक्रिया विलंबात मंत्रालयातून दबाव!

NMC Commissioner Dr Chandrakant Pulkundwar & Sudhakar Badgujar
NMC Commissioner Dr Chandrakant Pulkundwar & Sudhakar Badgujaresakal
Updated on

नाशिक : अनेक महिन्यांपासून पोतडीत बंद असलेले घंटागाडीचे भूत आता नव्याने बाहेर आले आहे. घंटागाडीच्या वादात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी थेट आयुक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना मंत्रालयातून दबाव येत असल्याचा आरोप केला. तर, आयुक्तांनी प्रस्तावाला अंतिमतः मंजुरी देण्यात आल्याचे सांगताना निर्णय प्रक्रियेत बाब असल्याची माहिती दिली. (Pressure from ministry in delaying ghanta gadi tender process Nashik Latest Marathi News)

२०१६ मध्ये पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देण्यात आला होता. चार डिसेंबर २०२१ ला ठेक्याची मुदत संपुष्टात आली. ठेक्याचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी सहा महिने अगोदर नवीन निविदा काढणे अभिप्रेत होते. विशेष म्हणजे महासभेने प्रशासकीय मान्यता देवूनही मुदतीत निविदा प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यानंतर विविध कारणे देत एक वर्षापासून घंटागाडी ठेकेदारांना मुदतवाढ दिली जात आहे. नवीन ठेकेदार नियुक्त केले जात नसल्याने नियुक्त घंटागाडी ठेकेदारांकडून अनियमितता होत आहे. दोन ते तीन दिवसानंतर प्रभागांमध्ये घंटागाडी येते. परिणामी दुर्गंधी पसरली आहे.

स्थायी समितीने २८ फेब्रुवारीला २०२२ रोजी करार करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार मार्च २०२२ अखेर कार्यारंभ आदेश देणे क्रमप्राप्त असताना अद्यापपर्यंत दिलेला नाही. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लेखा परिक्षणासाठी नस्ती पाठवल्याचे घनकचरा विभागाकडून सांगितले जाते. परंतु, निविदा अंतिम करण्यापूर्वी लेखा परिक्षण होते. त्यानंतर स्थायी समितीवर डॉकेट ठेवले जाते. आयुक्तांच्या आग्रहानुसार पुन्हा लेखा परिक्षण झाले. प्रस्तावात त्रुटी असेल तर दुरुस्ती झाली पाहिजे. यात गैर नाही, परंतु या सर्व प्रकरणात आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप श्री. बडगुजर यांनी केला.

NMC Commissioner Dr Chandrakant Pulkundwar & Sudhakar Badgujar
Bharat Jodo Yatra : नांदेडला भारत जोडो यात्रेत नाशिकचे पदाधिकारी सामील

नेमका विलंब हा कशासाठी ?

घंटागाडी निविदा अंतिम करून मक्तेदारांना कार्यारंभ आदेश देणे गरजेचे असताना त्यास विलंब होत आहे. विलंबामागे मंत्रालयातून दबाव आहे. निविदा प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतील तर फेरनिविदा केली पाहिजे, अन्यथा कार्यारंभ आदेश दिला पाहिजे. नेमका विलंब हा कशासाठी आहे, ही भूमिका समजून येत नाही. महापालिकेचे आर्थिक हित जोपासण्यासाठी की स्वतःचे हित जोपासण्यासाठी विलंब होत आहे. या संदर्भात आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी श्री. बडगुजर यांनी केली.

"घंटागाडी ठेकेदारांना कार्यारंभ आदेश दिले पाहिजे. या प्रक्रियेत होणारा विलंब संशय निर्माण करणारा आहे. प्रक्रिया लांबविण्यात मंत्रालयातून दबाव असल्याचे बोलले जाते."

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.

"घंटागाडी ठेका देण्याची प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे. निविदा प्रक्रियेला अंतिमतः मंजुरी देण्यात आली असून प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहे."

- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

NMC Commissioner Dr Chandrakant Pulkundwar & Sudhakar Badgujar
Gharkul Scheme : शिवाजीवाडीमधील 13 लाभार्थ्यांचे घरकुल रद्द!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.