Nashik Crime: सामनगाव परिसरात साडीचा फॉल घेण्याच्या बहाण्याने आला अन्‌ महिलेवर वार करून दागिने हिसकावले

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे.
Crime
Crimeesakal
Updated on

नाशिक : एकलहरा - सामनगाव रोडवरील टेलरिंग मटेरियल दुकानात साडीचा फॉलच्या खरेदीच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने ७३ वर्षीय महिलेवर धारदार हत्याराने वार करीत जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील दागिने असा १ लाख २० हजारांचा ऐवज हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pretext work of sari stabbed woman and stolen jewellery Nashik Crime)

शकुंतला दादा जगताप (७३, रा. नवीन सामनगाव) या संशयिताच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. समाधान दादा जगताप यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे एकलहरा-सामनगाव रोडवरील गाळ्यामध्ये टेलरिंग मटेरियल विक्रीचे दुकान आहे.

गेल्या सोमवारी (ता.१) त्यांची आई शकुंतला जगताप या दुकानावर होता. दुपारी साडेतीन पावणे चारवाजेच्या सुमारास पांढर्या रंगाच्या मोपेडवरून एक संशयित दुकानात आला आणि त्याने साडीच्या फॉलची मागणी केली.

शकुंतला या फॉल घेण्यासाठी मागे वळल्या असता, संशयिताने पाठीमागून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शकुंतला यांनी जोरदार विरोध केल्याने संशयिताने त्याच्याकडील धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार केल्याने त्या खाली पडल्या.

संशयिताने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील सोन्याचे दागिने असा १ लाख २० हजारांचा ऐवज खेचून पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक गणेश शेळके हे तपास करीत आहेत.

Crime
Dhule Crime News : ड्रंक अँड ड्राइव्ह’चे 91 गुन्हे; पोलिसांची नाकाबंदी

संशयिताकडून रेकी

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असलेल्या शकुंतला जगताप या दुकानात दुपारच्या वेळी एकट्याच असतात ही बाब संशयिताने हेरली होती.

तो दोन-तीन दिवसांपासून दुपारच्या वेळी त्यांच्या दुकानात काही ना काही खरेदीच्या उद्देशाने येऊन गेला होता. त्यामुळे त्याने रेकी करूनच सदरचा प्रकार केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

"संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून दोन दिवसात गुन्ह्याची उकल होईल."

- रामदास शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिकरोड

Crime
Nashik Fraud Crime: बिनव्याजी कर्ज देणाऱ्या बालाजी फायनान्सकडून फसवणूक! संचालकांसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.