Onion Rate : लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मुंबई, कोल्हापूरसह खेड-चाकण, सातारामध्ये क्विंटलभर कांद्याचा भाव सरासरी एक हजाराच्या पुढे पोचला आहे.
ही स्थिती असली, तरीही कांद्याच्या आगार असलेल्या जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये उन्हाळ कांद्याची विक्री शेतकऱ्यांना अद्याप ६०० ते ८५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने करावी लागत आहे. (price of onion in state along with district averages more than thousand per quintal nashik news)
संगमनेर आणि कोपरगावमध्ये आज ८०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांदा विकला गेला. त्याचवेळी येवल्यात ८००, सिन्नरमध्ये ६००, कळवणमध्ये ७०१, चांदवडमध्ये ६८०, मनमाडमध्ये ८५०, सटाण्यात ७५०, देवळ्यात ८०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव राहिला.
आजचे कांद्याचे क्विंटलचे सरासरी भाव रुपयांमध्ये असे : कोल्हापूर-१ हजार, मुंबई-१ हजार ५०, खेड-चाकण-१ हजार, सातारा-१ हजार १५०, लासलगाव-१ हजार १, पिंपळगाव बसवंत-१ हजार १००.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाकबद्दल ‘वेट अँड वॉच'
आखाती देशामध्ये पाकिस्तानच्या कांद्याने ३० टक्के ‘मार्केट' हिस्सा मिळवला आहे. मात्र अजूनही मलेशिया, सिंगापूर आणि दुबईमधील आयातदारांनी बिपोरजॉय चक्रीवादळामुळे पाकिस्तानच्या कांद्याची खरेदीसाठी ‘वेट अँड वॉच'ची भूमिका स्विकारली आहे.
चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी कराचीच्या किनारपट्टी भागात हे चक्रीवादळ धडकणार आहे.
ही सारी परिस्थिती लक्षात घेता, बिपोरजॉय चक्रीवादळ धडकल्यानंतर किनारपट्टी भागातील परिस्थिती निवळेपर्यंत पाकिस्तानच्या कांद्याची मागणी आयातदारांकडून नोंदवली जाण्याची शक्यता भारतीय निर्यातदारांना वाटत नाही.
त्यामुळे या आठवड्यात मलेशिया, सिंगापूर, दुबई, श्रीलंका, बांगलादेशमध्ये भारतीय कांद्याचा उठाव चांगला राहील, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.