Nashik Onion Rate Hike : आगरात कांद्याचा भाव 2200 ते 2400 रुपये; एका दिवसात वृद्धी

price of onion reached an average of Rs 2200 to 2400 per quintal nashik news
price of onion reached an average of Rs 2200 to 2400 per quintal nashik newsesakal
Updated on

Nashik Onion Rate Hike : कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे भाव क्विंटलला सरासरी दोन हजार २०० ते दोन हजार ४०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. एका दिवसात कांद्याच्या भावात क्विंटलला सरासरी १०० ते ५०० रुपयांची वृद्धी झाली आहे.

गुरुवारच्या (ता. १०) तुलनेत आज बाजारपेठेत कांद्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. निर्यातीपेक्षा देशांतर्गत मागणी अधिक असल्याने भावाचा आलेख उंचावत चालल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (price of onion reached an average of Rs 2200 to 2400 per quintal nashik news)

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातून कांदा सिंगापूर, मलेशियासह आखाती देशातील बाजारपेठांमध्ये पाठवण्यात येत असून, पाकिस्तानच्या ८० टक्के कांद्याला तेथील आयातदारांनी पसंती दिली आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला सद्यःस्थितीत २० टक्के मागणी आहे. श्रीलंका आणि बांगलादेशमधील आयातदारांनी भारतीय कांद्याला हात दिला आहे.

अशा एका वातावरणात फिलीपीन्स सरकार चीनच्या सोबत इतर देशांमध्ये कांद्याची निर्यात खुली करण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. कांद्याचा व्यापार निर्यातीपेक्षा देशांतर्गत बाजारपेठांवर अवलंबून राहिला आहे. आसाम, दिल्ली, पंजाब, बिहार, ओडिशा, झारखंड, मणिपूर, पश्‍चिम बंगालसाठी जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे.

सलग सुट्यांमुळे वाढली खरेदी

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये शनिवारी (ता. १२) दोन सत्रांऐवजी एका सत्रात कांद्याची खरेदी होईल. रविवारी (ता. १३) साप्ताहिक, मंगळवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिन, बुधवारी (ता. १६) पारशी नूतन वर्ष आरंभ अशी बाजारपेठेतील व्यवहाराला सुटी असेल.

त्यामुळे कांद्याची खरेदी वाढल्याने कदाचित कांद्याच्या भावात वृद्धी झाली आहे काय? याचे उत्तर अर्थात, गुरुवारनंतर (ता. १७) नियमित सुरू होणाऱ्या बाजारपेठांमधील व्यवहारातून मिळण्यास मदत होणार आहे. देशांतर्गत नाशिकच्या कांद्याशी मध्य प्रदेशातील कांद्याची स्पर्धा होत असते. यंदा मध्य प्रदेशात कांद्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांना मिळाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

price of onion reached an average of Rs 2200 to 2400 per quintal nashik news
White Onion खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

कांद्याच्या भावाची स्थिती

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठेचे नाव आजचा भाव गुरुवारचा (ता. १०) भाव

लासलगाव २ हजार २०० २ हजार ७५

पिंपळगाव बसवंत २ हजार ४०० १ हजार ९५०

येवला २ हजार २०० १ हजार ८५०

सिन्नर-नायगाव २ हजार ३०० १ हजार ८००

चांदवड २ हजार २६० १ हजार ८००

मनमाड २ हजार १०० २ हजार

कोल्हापूर १ हजार ६०० १ हजार ५००

price of onion reached an average of Rs 2200 to 2400 per quintal nashik news
Onion Rate Hike: उन्हाळ कांद्याच्या भाववाढीचा ‘ट्रेंड’! पिंपळगावमध्ये आठवड्यात सरासरी 551 रुपयांची वृद्धी

मुंबई १ हजार ५५० १ हजार ३००

खेड-चाकण १ हजार ४०० १ हजार ५००

पुणे १ हजार ५०० १ हजार ६००

‘बफर स्टॉक’मधील कांदा विक्रीसाठी

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने यंदा केलेल्या तीन लाख टन कांद्याच्या ‘बफर स्टॉक’मधून कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागाचे सचिव रोहितकुमार सिंह यांनी ‘नाफेड’च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेऊन विक्री व्यवस्थेच्या पद्धतीविषयी धोरण निश्‍चित केले.

"दक्षिण भारतातील विशेषतः कर्नाटकमधील नवीन कांदा पंधरा दिवसांमध्ये बाजारात विक्रीसाठी येईल. या कांद्याची आवक किती प्रमाणात होते, यावर नाशिक जिल्ह्यातील कांद्याची खरेदी निर्यातीसाठी किती होणार, याचे गणित अवलंबून असेल. मात्र कर्नाटकमध्ये कांदा कमी असल्यास निर्यातदारांना पुन्हा नाशिककडे येण्याशिवाय पर्याय नाही.

त्यातून कांद्याच्या भावात वाढ अपेक्षित आहे. फिलिपीन्सने चीनसह इतर देशांत कांद्याच्या निर्यातीचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा राज्यातील नवीन लाल कांद्याला होईल. पाकिस्तानच्या कांद्याच्या सालीचा प्रश्‍न असल्याने भारतीय कांद्याला मागणी आहे." - विकास सिंह, कांदा निर्यातदार

price of onion reached an average of Rs 2200 to 2400 per quintal nashik news
Onion : ग्राहकांना दिलासा! दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा खुला करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.