Rate Hike : साबुदाणा व शेंगदाण्याच्या दरवाढीने यंदा 'महाग'शिवरात्री!

 rate hike
rate hikeesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : किराणा यासह साऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असताना उपवासाचे सारे जिन्नसही महागले आहेत. (prices of groundnut sago bhagar etc increased by an average of 15 to 20 percent nashik news)

शेंगदाणे, साबुदाणा, भगर, राजगिरा आदी वस्तूंच्या दरात सरासरी १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास यंदा अधिक खर्चिक ठरणार आहे.

उपवासानिमित्त शेंगदाणे, साबुदाणा, भगर यासह उपवासाच्या तयार पिठाला मागणी आहे. वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसत आहे. सध्या साबुदाणा प्रती किलो ७० रुपये, शेंगदाणे १२२ ते १२६ रुपये किलो तर भगरचे भाव किलोमागे ११४ रुपये आहे.

महाशिवरात्रीला साबुदाणा ते शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात होते. किराणा किरकोळ बाजारात एका महिन्यापूर्वी शेंगदाण्याच्या दरातही प्रति किलो १० ते १५ रुपयांनी वाढ झाली, अशी माहिती पिंपळगाव बसवंत येथील खाबिया ट्रेडर्सचे अनिल खाबिया यांनी दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 rate hike
Nashik News : विनापरवाना मद्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

साबुदाण्याचे दर ६० रुपये किलो होते. ते आता ७० रुपयावर पोहोचले तर शेंगदाण्याचे दर ११० वरून १२५ रुपये किलो झाले आहेत. ११० रुपये किलो असणारा भगर १२० रुपये किलो झाला आहे. पेंडखजूरही २०० रुपये किलोपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. गुजरातमध्ये आलेल्या पावसामुळे शेतातील भुईमुगाच्या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी झाले.

साबुदाण्याची साठेबाजी

देशात साबुदाण्याच्या उत्पादनात घट झाली आहे. बाजारात मागणी लक्षात घेता व्यापाऱ्यांनी साठेबाजी सुरू केल्यामुळे दरवाढ झाली आहे. सध्या साबुदाण्यांची विक्री होत आहे. भगर तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या लिटील मिलाईट (छोटी बाजरी) चे उत्पादन महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, ओरिसा राज्यात २० टक्के कमी झाले आहे. यंदा भगराच्या दरातही वाढ झाली आहे.

 rate hike
Naming Ritual : दहेगावात चक्क कालवडीचा नामकरण विधी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.