आवक घटल्याने पालेभाज्यांच्या दरात तेजी; पावसामुळे आठवडे बाजारात पळापळ

vegetable price hike
vegetable price hikeesakal
Updated on

नाशिक : पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने बाजार समितीतील पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांच्या आवकेत पन्नास टक्के घट झाली आहे. त्यामुळे बुधवारच्या आठवडे बाजारातही भाज्यांचे दर चढेच राहिले. सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे गंगाघाटावरील आठवडेबाजारात विक्रेत्यांसह खरेदीदारांची चांगलीच धावपळ उडाली. (Prices of leafy vegetables rise due to drop in arrivals Nashik Latest Marathi News)

नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे एरवी मोठ्या प्रमाणावर आवक होत असलेल्या दिंडोरी रोडवरील नाशिक बाजार समितीतील आवकही मंदावली आहे. आवक निम्मावर आल्याने भावात तेजी गाठली.

त्यामुळे आठवडेबाजारात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू या पालेभाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांची तीस ते पन्नास रुपये जुडी या दराने विक्री सुरू होती. फ्लॉवरचा कंद ४० रुपये दराने उपलब्ध होता. दर वाढल्याने गृहिणींचे बजेट काही प्रमाणात कोलमडले.

रात्री पावसामुळे दरात घसरण

सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे आठवडेबाजारात विक्रेत्यांसह खरेदीदारांची पळापळ झाली. काही विक्रेत्यांनी मिळेल आहे त्या भावात भाजी विकणे पसंत केले. त्यामुळे सातनंतर काही भाज्यांचे दर निम्मावर आले होते.

विशेष म्हणजे आठनंतर पावसाने उघडीप दिल्याने काही विक्रेत्यांनी उशिरापर्यंत विक्री केली. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळनंतर सुरू होणाऱ्या पावसामुळे पालेभाज्यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समितीतील आवकही निम्म्यावर आली आहे. त्यामुळे पालेभाज्यांना चांगला दर मिळत आहे.

vegetable price hike
Adivasi Vikas Bhavan : ‘राजपत्रित’चा पदभार कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे

क्रम पालेभाजी आवक कमीत कमी भाव जास्तीत जास्त सरासरी

१. मेथी ५५ हजार जुडी २,५०० ६,३०० ५,०००

२. कोथिंबीर ५८ हजार जुडी (गावठी) १,००० ८,५०० ५,२००

३. शेपू ६,१४० जुडी १,५०० ३,२०० २,७००

४. कांदापात ३,८०० जुडी १,५०० ३,००० २,५००

vegetable price hike
Nashik : परप्रांतीय सायकलस्वाराने भारत भ्रमंतीत लावली 13 हजार झाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.