Nashik News: प्राथमिक आरोग्य केंद्रे जोडली जाणार ‘ई-संजीवनी’शी!

ग्रामीण भागातील रुग्णांना केंद्रात मिळणार वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
e Sanjivani
e Sanjivaniesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील गावे ‘आदर्श’ होत असताना तेथील आरोग्य सुविधा मागास राहू नये, सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत.

याचाच भाग म्हणून प्रशासनाने आता जिल्ह्यासाठी ई-संजीवनी टेलिमेडिसीन मिशन हाती घेतले असून, या अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे ही ई-संजीवनीशी जोडली जाणार आहेत. यात ग्रामीण भागातील जनतेस आरोग्य केंद्रातूनही थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला मिळेल. (Primary health centre will be connected with e Sanjeevani and rural patients will get advice from medical experts at centre nashik)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्य विभागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जनरल फिजिशियन वगळता विविध विकारांचे तज्ज्ञ उपलब्ध नाही.

त्यामुळे ग्रामीण जनतेला शासकीय यंत्रणेंतर्गत तज्ज्ञ शोधण्यासाठी थेट जिल्हा रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. आरोग्य केंद्रातच रुग्णांना विविध आजारांवरील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला मिळावा, यासाठी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले ई-संजीवनी केंद्र सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना जोडण्याचा निर्णय श्रीमती मित्तल यांनी घेतला आहे.

या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रांमध्येही सर्व सुविधा देण्यात येतील. रुग्णांना https://esanjeevani.mohfw.gov.in/ या पोर्टलवर नोंद करून वैद्यकीय तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येईल.

वैद्यकीय सल्ल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या ऑनलाइन प्रिस्क्रिप्शनची प्रतही मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेता येईल. हे अॅप गुगल प्लेद्वारे डाउनलोड करता येणार आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातून रोज किमान ३०० ते कमाल ५०० कॉल्स या टेलिमेडिसीन सुविधेसाठी येत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

e Sanjivani
Nashik ZP News: पहिल्याच दिवशी वर्षा फडोळ फिल्डवर; पेठ तालुका दौरा

या ऑनलाइन सल्ल्यात रुग्णांना दोन प्रकारे सेवा मिळणार आहे. पहिल्या प्रकारात रुग्ण ते डॉक्टर थेट संवाद साधला जाईल; तर दुसऱ्या प्रकारात डॉक्टर ते डॉक्टर संवाद साधून उपस्थित रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये ही टेलिमेडिसीन सेवा सुरू करण्यात आली. डॉक्टर ते डॉक्टर ओपीडींतर्गत रुग्णाची विशेष समस्या तज्ज्ञ डॉक्टरांना सांगण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तज्ज्ञांशी ऑनलाइन संवाद साधतील.

सदर सेवा पुढील महिन्यापासून सुरू करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती मित्तल यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.

e Sanjivani
Nashik Farmers Agitation: शेतकरी संघर्ष संघटनेचे अन्नत्याग आंदोलन; उपोषणाचा 50 वा दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.