Nashik Election News: प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक की बिनविरोध? अर्ज दाखल करण्यास केवळ दोनच दिवस

Election
Electionesakal
Updated on

देवळा : संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित या आर्थिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, अर्ज भरण्यास केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांची पुढील दोन दिवस धावपळ होणार आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतर्फे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संस्थेची मालमत्ता मोठी असल्याने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र तरीही निवडणूक होणार की बिनविरोध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या संघटना यात सक्रिय झाल्याने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. (Primary Teachers Credit Union Election or Uncontested Only two days to apply Nashik News)

दि प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून, एकूण एक हजार ३४ मतदार मतदान करणार आहेत. सध्या अर्जविक्री सुरू असून, अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर ही शेवटची मुदत आहे.

६ डिसेंबरला छाननी, तर २१ डिसेंबरला अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख आहे. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. गरज पडल्यास ३१ डिसेंबरला मतदान होईल.

त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सानप यांनी नमूद केले. या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार, हे माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल.

Election
Rajasthan Election: बायको मतदान करायला विसरली अन् एका मताने झाला मुख्यमंत्र्यांचा पराभव.. राजस्थान निवडणुकीचा फिल्मी ड्रामा

दि प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आणि त्याअंकीत आचार्य दोंदे भवन ट्रस्ट ही संस्था आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष हेच या ट्रस्टचे अध्यक्ष असतात.

या संस्थेची मालमत्ता मोठी असल्याने या निवडणुकीकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र असे असले तरी या संस्थेचे बहुतांश मतदार जुने आहेत. अनेकजण निवृत्तीच्या मार्गावर असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

तालुकानिहाय मतदार

चांदवड- ६५, कळवण-देवळा- १६४, सटाणा- ११६, मालेगाव- ११५, इगतपुरी- १०७, नाशिक-त्र्यंबक- ९८, येवला- ३५, नांदगाव- ४३, निफाड- ७७, दिंडोरी- ८३, पेठ-सुरगाणा- ७४, सिन्नर- ५७

Election
Election Results: फडणवीस प्रचाराला गेले तेथे पक्षाला चांगले यश; भारत जोडो अपयशी ठरल्याचा भाजप नेत्याचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.