Nashik Narendra Modi : राष्ट्रीय सुवा महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या पथकाने गुरुवारी (ता. २८) नाशिकमध्ये कार्यक्रमाच्या जागेची पाहणी केली.
या वेळी साधुग्राम येथील मैदानाची पाहणी केल्याने ही जागा निश्चित होण्याची शक्यता आहे.(Prime Minister meeting is likely to be held at Sadhugram nashik news)
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. १२ ते १६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा आणि होणारी गर्दी लक्षात घेऊन जागेचा शोध सुरू आहे.
केंद्रीय पथकाने गुरुवारी नाशिकमध्ये येऊन जागेची चाचपणी केली. या वेळी साधुग्रामच्या जागेबाबत समितीचे एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यापूर्वी २०१९ मध्ये याच मैदानावर मोदींची सभा झाली होती.
स्पर्धा आयोजनाबाबत निश्चित करण्यात येणाऱ्या ठिकाणाबाबत चर्चा झाली. कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कला दालन, शालिमार, रावसाहेब थोरात हॉल, गंगापूर रोड, उदोजी मराठा शैक्षणिक वारसा संग्रहालय, गंगापूर रोड, ठक्कर डोम ही ठिकाणे निश्चित झाली.
या सभागृहांचीही समितीने पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, संचालक, युवा व क्रीडा मंत्रालय, वनिता सूद, युवा व क्रीडा मंत्रालयाचे अवर सचिव धर्मेंद्रकुमार यादव, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सहायक जिल्हाधिकारी जतीन रहमान.
उपसंचालक क्रीडा रवींद्र नाईक, संजय सबनीस, सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अविनाश टिळे, सुमंतकुमार यादव, युवा अधिकारी, क्षेत्रिय निदेशालय, राष्ट्रीय सेवा योजना, अजय शिंदे, क्षेत्रिय निदेशक, राष्ट्रीय सेवा योजना प्रकाशकुमार मनुरे, नेहरू युवा केंद्राचे राज्य संचालक आदी अधिकारी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.