Nashik Accident Case : ‘त्या’ मद्यधुंद कारचालकाची झिंग दुसऱ्या दिवशीही तशीच

Accident News
Accident Newsesakal
Updated on

नाशिक : मद्याच्‍या धुंदीत बेफामपणे कार चालवत दुचाकीस्‍वारासह पादचाऱ्यांना उडविणारा प्राध्यापक साहेबराव निकम शुक्रवारी (ता.१८) सायंकाळपर्यंत नशेतच होता. रुग्‍णालयात दाखल असलेल्‍या प्राध्यापकाची झिंग उतरताच त्‍याला पोलिस ताब्‍यात घेणार असल्‍याचे समजते. दरम्‍यान या अपघातातील एकास खासगी रुग्‍णालयात तर अन्‍य एकाला ईएसआयसी रुग्‍णालयात उपचारार्थ हलविले आहे. (Private ESIC treatment for those who crushed drink drive professor Nashik Accident Case News)

Accident News
Nashik : अबब! ट्रॅक्टरच्या सीटखाली निघाला साप!!

मद्यधुंदावस्थेत चालकाकडून नाशिकच्‍या रस्‍त्‍यावर धावत्‍या कारने अनेक नाशिककरांच्या हृदयाचा ठेका चुकविला होता. काल (ता.१७) घडलेल्‍या या घटनेतील संशयित साहेबराव दत्तात्रय निकम यास जिल्‍हा रुग्‍णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे. शुक्रवारी वैद्यकीय चाचणी बाकी होती. यात सिटी स्कॅन केले जाणार आहे. दरम्‍यान या अपघाताच्‍या घटनेत जखमी झालेले पंकज शंकर मोरे (२७, रा.सिडको) आणि अविनाश प्रल्हाद साळुंके (४५, रा. गंगापूररोड) गंभीर जखमी झाले आहेत.

सिन्नर विद्यालयातील मुख्याध्यापक साळुंके यांना शुक्रवारी खासगी रुग्‍णालयात उपचारासाठी हलविले. तर कामगार मोरे यांना ईएसआयसीच्‍या रुग्णालयात हलविले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्‍यावेळी चालक असलेल्‍या प्राध्यापकास उभेदेखील राहता येत नव्‍हते. संबंधिताचे स्‍वास्थ्य बरे होऊन रुग्‍णालयातून सोडल्‍यानंतर पोलिसांकडून सखोल चौकशीसाठी ताब्‍यात घेतले जाणार आहे. पोलिस कोठडीतील चौकशीनंतर या घटनेमागील कारण समोर येणार असल्‍याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Accident News
Nashik Fraud Crime : जागामालकाचा बनाव रचुन खरेदी पडली महागात!; संशयितास अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.