Nashik : शासकीय विश्रामगृहावरील खासगी वाटाघाटी भोवली; अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Government Rest House
Government Rest Houseesakal
Updated on

नाशिक : सुटीचा दिवस असूनही शासकीय विश्रामगृहावर पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारांसमवेत घडवून आलेली नियोजित भेट महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम व मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना चांगलीच भोवली आहे. सदर प्रकार हा शिस्तभंगाच्या कारवाई करणारा ठरत असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महापालिकेकडून संपूर्ण शहरात धूर व औषध फवारणी करण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला जातो. सध्या सुरू असलेल्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली असतानादेखील निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. वास्तविक पूर्वीचा ठेका १८ कोटी रुपयांचा असताना नवीन ठेक्याची किंमत ४६ कोटी रुपयांवर पोचविण्यात आली. डिझेल दरवाढीचे कारण दिले गेले. त्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. न्यायालयातून काही प्रमाणात दिलासा मिळाल्यानंतर माजी आयुक्त रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात अनावश्यक खर्चात कपात करून ते ३३ कोटी रुपयांची सुधारित निविदा काढली.

निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या व विद्यमान ठेका असलेल्या कंपनीसाठी सोईस्कर निर्णय घेतले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच सुटीच्या दिवशी शासकीय विश्रामगृहावर अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम व मलेरिया अधिकारी डॉ राजेंद्र त्र्यंबके यांच्यासह वादग्रस्त पेस्ट कंट्रोलचा ठेकेदार उपस्थित असल्याने व विशेष म्हणजे पेस्ट कंट्रोल ठेकेदाराच्या गाडीतच अधिकाऱ्यांना विश्रामगृहावर आणल्याचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर पडल्याने पेस्ट कंट्रोल ठेक्यासंदर्भातील संशय अधिकच वाढला.

Government Rest House
Pest Control Contract in Dispute : अधिकारी- ठेकेदारांच्या विश्रामगृहावरील भेटीने संशयाचे वर्तुळ

मलेरिया अधिकारी त्र्यंबके यांनी अत्राम यांच्या बोलण्यावरून आपण शासकीय विश्रामगृहावर आल्याचा खुलासा केला. तर अतिरिक्त आयुक्त अत्राम यांनी संबंधित व्यक्ती ठेकेदार होता हे मला माहीत नसल्याचे उत्तर देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

सात दिवसाच्या आत खुलासा करा

महापालिकेच्या कामकाजासंदर्भात फाइल बाहेर घेऊन जाता येत नाही, असे असतानादेखील अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम व राजेंद्र त्र्यंबके यांनी महापालिकेची फाइल शासकीय विश्रामगृहावर घेऊन गेल्याने सदर कारवाई शिस्तभंगाच्या चौकटीत येत असल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसाच्या आत यासंदर्भात खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

Government Rest House
Nashik Crime News : भुरट्यांचे लक्ष आता पुलाच्या कठड्यांकडे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()