नाशिकमध्ये कोविड सेंटरवर होणार खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती

Privet Security Gaurad
Privet Security GauradGoogle
Updated on
Summary

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. यादृष्टीने महापालिकेकडून तयारीचा भाग म्हणून पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे.

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. यादृष्टीने महापालिकेकडून तयारीचा भाग म्हणून पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. दुसरीकडे नव्याने उभारल्या जाणाऱ्या आठ कोविड सेंटरमध्ये (Covid Center) हल्ले व नातेवाइकांची गर्दी रोखण्यासाठी खासगी सुरक्षारक्षकांची (Privet Security Gaurad) नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Private security guards will be posted at covid Center in Nashik)

गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली. त्या वेळी नवीन बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, समाजकल्याण, ठक्कर डोम, मेरी वसतिगृह येथे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. दुसऱ्या लाटेत तब्बल १८८ खासगी कोविड सेंटरला मान्यता देण्यात आली. महापालिका व खासगी कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांना मारहाण, वादावादीचे प्रसंग, तसेच महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये सातत्याने नातेवाइकांचा राबता राहिला. एप्रिलमध्ये डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर धावाधाव झाली. त्या वेळी नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने कोरोना स्प्रेडर्स ठरले. नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात नगरसेविकेच्या पतीने वाहन घुसवून तोडफोड केली. महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये महापालिका व महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक असूनही त्यांना दाद दिली जात नाही. रुग्णालयात भोजनाची व्यवस्था असूनही नातेवाइकांकडून डबे पुरविले जातात. डॉक्टरांशी वाद घालणे, रुग्णालयात वावरणे यांसारख्या प्रकारामुळे प्रशासनाने खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यात आठ कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. त्या कोविड सेंटरवर खासगी एजन्सीजचे सुरक्षारक्षक तैनात राहतील.

Privet Security Gaurad
नाशिक जिल्‍ह्यात दुपारनंतर बाहेर फिरण्यास मनाई; जमावबंदी आदेश लागू

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचा पर्याय

कोविड सेंटरच्या सुरक्षेसाठी महापालिकेने राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडे (एनआयए) मागणी केली होती. वास्तविक अशा प्रकारची मागणी करता येत नसली तरी पर्याय तपासून बघितला. परंतु, पहिल्या टप्प्यात रेकी करण्यासाठी लाखो रुपये अदा करण्याची मागणी केल्याने खासगी सुरक्षा एजन्सीचा पर्याय निवडण्यात आला आहे.

Privet Security Gaurad
रेशनचे धान्य वाढविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा - छगन भुजबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()