Nashik News : रेकॉर्डिंग अभावी CCTV फक्त शो पीस! बँकांसह व्यापाऱ्यांकडे डेटा सेव्ह नसल्याने अडचण

CCTV
CCTVesakal
Updated on

कळवण (जि. नाशिक) : शहरातील मोठ्या शोरूमसह सीसीटीव्ही यंत्रणेला बॅकअप रेकॉर्डिंग फुटेज नसल्याने सीसीटीव्ही शो पीस बनताना दिसत आहेत. बहुतांशी ठिकाणी बॅकअपचा प्रश्न असल्याने आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात, असे भिंतीवर लिहिलेले फलकही कुचकामी ठरत आहेत.

चोरी झाली, की सीसीटीव्ही असूनही रेकॉर्डिंग बॅकअप नसल्याचा पोलिसांना अनुभव येत आहे. त्यामुळे सीसीटीव्हीसह त्याचे रेकॉर्डिंग बॅकअप ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी बँकांसह व्यापारी, नागारिकांना दिल्या आहेत. (problem that traders including banks do not have data backup cctv of no use at kalvan Nashik News)

कळवण शहरात मोठ्या व्यापाऱ्यांच्या गुदाम, शोरूमसह मोठ्या बँका, विविध संस्थांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आहेत. मात्र, त्यांनी त्या कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग बॅकअप ठेवले नाही. त्यामुळे सीसीटीव्हीत कैद होणारे सेव्ह होत नाही. परिणामी, सीसीटीव्ही यंत्रणा असूनही बॅकअपअभावी सुरक्षा रामभरोसेच असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी तीच स्थिती आहे. मध्यंतरी पोलिसांनी त्यासाठी सर्वच ठिकाणी पाहणी केली. त्या वेळी त्यांना ही स्थिती दिसून आली. त्यामुळे सीसीटीव्ही लावा, त्यासोबत त्याचे रेकॉर्डिंग बॅकअप ठेवा, असा पोलिसांचा आग्रह वाढला आहे. शहरांसह ग्रामीण भागात, तसेच मळ्यातही सीसीटीव्हीची क्रेझ वाढली आहे.

शहरात अनेक ठिकाणी ‘आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात’, असे फलक दिसतात. मात्र, ते फलक केवळ सीसीटीव्हीची भीती दाखविण्यासाठीच आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. कॅमेऱ्याचे बॅकअप रेकॉर्डिंग व कंट्रोल रूम कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याची सूचनाही पोलिस करत आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

CCTV
Rajya Balnatya Spardha : नाशिककर अनुभवताहेत बालनाट्यांची मेजवानी; 5 नाटकांचे सादरीकरण

बॅकअप होणाऱ्या हार्डडिस्कसह कॅमेरेच चोरटे गायब करत आहेत. त्यामुळे हाती काहीच पुरावे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रेकॉर्डिंग बॅकअप महत्त्वाचे आहे. त्यासाठी पोलिसांना व्यापक प्रयत्न करावे लागणार आहेत.

"कळवण शहरात व तालुक्यात व्यापारी, बँक, अनेक प्रतिष्ठान व अनेक नागरिकांनी दुकान किंवा घरापुढे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत; परंतु काहीचे कॅमेरे बंद आहेत, तर काहीचे बॅकअप नाही. सजग नागरिकांनी अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करून पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे."

- समाधान नागरे, पोलिस निरीक्षक

...असे आहेत फायदे

- अनुचित घटणेवेळी रेकॉर्डिंगमुळे सत्यता समोर येते
- नाईट व्हीजनच्या कॅमेऱ्यामुळे अनेक गोष्टी तपासासाठी मदत
- पोलिस तपासाला गती, संशयितांची ओळख पटविण्यासही मदत
- सीसीटीव्हीमुळे अनेक घटना टाळतात
- शोरूम, बँकांत कामाला शिस्त, इतर ठिकाणी शिस्त

CCTV
Uddhav Thackeray Group : ठाकरे गटात पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश! संजय राऊत यांच्याकडून स्वागत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()