नाशिक : राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तपोवनातील साधुग्राममध्ये धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जय बाबाजी भक्त परिवाराच्या भाविकांच्या प्रचंड उत्साहात व भक्तीभावात आजपासून प्रारंभ झाला. (Procession between Ram Teerth and Sadhugram Jai Babaji Devotee Parivar religious ceremony begins with enthusiasm Nashik News)
तत्पूर्वी सकाळी आ़ठला महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते रामतीर्थावर गोदावरीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रामतीर्थ ते तपोवनातील साधुग्रामपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.
७७ किलो चांदीच्या रथात संत जनार्दन स्वामी महाराजांच्या पादुका दर्शनार्थ ठेवण्यात आल्या होत्या. शोभायात्रेत दोनशे टाळकरी, मृदुंग वादक, १०८ कलशधारी मुली व महिला, लेझीम, झांजपथक, शंख, डमरूसह कलशधारी महिला, टाळमृदंगाच्या गजरात व ओम जनार्दनायच्या गजराने वातावरण चैतन्यमय झाले होते.
जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रचंड उत्साहाने अनेकांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्मृती जागृत झाल्या. शोभायात्रा दहाला तपोवनात पोहोचली.
स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या धर्मसोहळ्याप्रसंगी श्री १०८ महंत सेवागिरी महाराज, महंत परमेश्वरानंदगिरी, स्वामी कैवल्यानंद महाराज, स्वामी देवानंद महाराज, ब्रह्मचारी ऋग्वेदानंद महाराज, रामानंद महाराज, दौलतानंदगिरी महाराज, पिनाकेश्वर महाराज, आत्मा मलिक ध्यान केंद्राचे अभयानंद महाराज आदींसह भाविक उपस्थित होते.
तत्पूर्वी पहाटे पाचला जनार्दन स्वामी यांनी स्पर्श केलेल्या वेरूळ येथील श्री सिद्धेश्वर शिवलिंगास अभिषेक करण्यात आला. सहाला विधीग्रंथाचे सामुहिक पठण झाल्यावर भागवत कथेवर आधारित २० मिनिटांची नाटिका सादर करण्यात आली. त्यानंतर आरती व सत्संग झाला.
संगीतमय श्रीरामकथा
मुख्य सभामंडपात दुपारी १२ ते ३ यावेळेत प्रसिद्ध रामायनाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या मधूर वाणीतून संगीतमय श्रीरामकथा झाली.
पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची उपस्थिती होती. साधू संतांच्या उपस्थितीत आरतीनंतर रामकथेची समाप्ती झाली.
विविध कार्यक्रम होणार
रविवारपासून २४ डिसेंबरपर्यंत याठिकाणी प्रसिद्ध रामायनाचार्य समाधान महाराज शर्मा यांची श्रीरामकथा, महायज्ञ, मौनव्रत अनुष्ठान, अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, अभिषेक, भागवत पारायण, भागवत वाचन, ध्यान, पारायण, श्रमदान आदींचे आयोजन करण्यात आले आहे.
क्षणचित्रे
- महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था.
- रामतीर्थावरून काढलेल्या शोभायात्रेत शिस्तीचे दर्शन.
- कलशधारी महिलांनी वेधले लक्ष
- तपोवनात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्मृती जागृत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.