Meri Mati Mera Desh : जिल्ह्यात अमृत कलशाच्या शोभायात्रा

Meri Mati Mera Desh
Meri Mati Mera Deshsakal
Updated on

Nashik ZP News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात ‘माझी माती-माझा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही ‘माझी माती-माझा देश’ अभियानांतर्गत सर्व ग्रामपंचायतींत अमृत कलश यात्रा काढण्यात येतात.

१ ऑक्टोबरपर्यंत या कलशांचे संकलन तालुकास्तरावर पंचायत समिती कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. सर्व गावांमधून गोळा करण्यात आलेल्या कलशातील माती एकत्रित करून तालुकास्तरावर प्रातिनिधिक कलश तयार करण्यात येईल. (Procession of Amrit Kalash in district Meri Mati Mera Desh Nashik ZP News)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत अमृत कलश यात्रा ही उत्साहात काढण्यात यावी, याबाबतच्या सूचना ग्रामपंचायत विभागास दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी सर्व तालुक्यांतील गटविकास अधिकाऱ्यांना अमृत कलश यात्रा काढण्याबाबत मार्गदर्शन केले.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील एक हजार ३८८ ग्रामपंचायतींमध्ये अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहेत. अमृत कलश अभियानांतर्गत प्रत्येक गावात एक अमृत कलश तयार करण्यात येत असून, यात प्रत्येक घरातून माती गोळा करण्यात येते.

Meri Mati Mera Desh
ZP Payment Hike : जूनअखेरीस निवृत्तांना 1 जुलैची वेतनवाढ; ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त

ज्या कुटुंबांकडे शेती आहे अशा कुटुंबांतील सदस्यांकडून माती व ज्या कुटुंबांकडे शेती नाही अशा कुटुंबातील सदस्यांकडून एक चिमूटभर तांदूळ मातीच्या कलशात जमा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून या अभियानास सुरवात झाली असून, आजपर्यंत ९५७ ग्रामपंचायतींचे अमृत कलश तयार करण्यात आले.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनीही त्र्यंबकेश्वर येथे अभियानात सहभाग नोंदवून अमृत कलशात माती टाकून सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

Meri Mati Mera Desh
Nashik ZP News: जि. प. कर्मचाऱ्याच्या प्रिंटरमध्ये साप!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.