Nashik News : चांदोरी, सायखेडा याठिकाणी गोदावरीत निर्माण होणाऱ्या पाणवेलींपासून आता विविध प्रकारच्या आठ जीवनोपयोगी वस्तू बचत गटांमार्फत निर्माण करण्यात येणार आहेत.
या वस्तूंचे मार्केटिंग आणि शॉपिंग करण्याची जबाबदारी सेवाभावी संस्थांची राहील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (Production of 8 useful items from panveli Innovative initiative of ZP at Chandori Saikheda Nashik News)
चांदोरी-सायखेडा येथे गोदावरीवर पाणवेलींचा थर साचतो. ग्रामस्थांच्या मदतीने गोदावरीला पाणवेलींपासून मुक्त करण्यात आले. मात्र, या पाणवेली ठेवायच्या कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता.
अशा वेळी नवजीवन या सेवाभावी संस्थेशी चर्चा करून या पाणवेलींपासून काही जीवनोपयोगी वस्तू तयार करण्यात येतात का, याची पडताळणी करण्यात आली. यासाठी सेवाभावी संस्थेच्या सूचनेप्रमाणे आसाममधून दोन प्रशिक्षकही बोलविण्यात आले.
या प्रशिक्षकांमार्फत बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी या पाणवेलींपासून चहाच्या कपाखालील कोस्टर बनवून दाखविले. अशाच प्रकारे पाणवेलींपासून सात ते आठ विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यात येणार आहेत.
या वस्तू बनविण्याचे मशिनही नवजीवन या सेवाभावी संस्थेने या महिला बचतगटाला पुरविले असून, यापुढील काळात मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची निर्मिती या पाणवेलींपासून करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या वस्तूंचे ऑनलाइन मार्केटिंग आणि शॉपिंग सेवाभावी संस्थेकडून करण्यात येईल, अशी माहितीही मित्तल यांनी दिली.
मार्केटिंगची जबाबदारी सेवाभावी संस्थेवर
पाणवेलींपासून विविध प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू निर्माण करण्यात येणार असून, या वस्तूंचे ऑनलाइन पद्धतीने मार्केटिंग करण्याची जबाबदारी नवजीवन या सेवाभावी संस्थेने घेतली आहे. महिला बचत गटांना यामुळे रोजगारनिर्मिती होईल.
पर्यावरणपूरक काम असल्याने पाणवेलींपासून विविध प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू निर्माण करण्यात येणार असून, या वस्तूंचे ऑनलाइन पद्धतीने मार्केटिंग करण्याची जबाबदारी नवजीवन या सेवाभावी संस्थेने घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.