Nashik News: प्रा. डॉ. महालेंच्या दुसरे पेटंट शासकीय जर्नल्समधून प्रकाशित!

आदिवासी भागातील पहिलेच राज्यशास्त्राचे संशोधक
Dr Mahales second patent published in government journals
Dr Mahales second patent published in government journals esakal
Updated on

Nashik News : त्र्यंबकेश्वर येथील मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भागवत महाले यांचे राज्यशास्त्र विषयाचे दुसरे पेटंट मंजूर झाले आहे. (Prof Dr Mahales second patent published in government journals First researcher of political science in tribal areas Nashik News)

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नेहमी संशोधनाचा दृष्टीकोन ठेवून तो कायम प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तरच देशाचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे प्रा. डॉ. भागवत महाले यांच्या संशोधनातून संदेश देण्यात आला आहे.

राज्यशास्त्र विषयात ‘आऊटसोर्सिंग मानवी संसाधन कार्य आणि कार्यप्रदर्शन’ या संशोधन विषयात प्रशासकीय आणि खासगी कार्यात मानवी स्रोत आणि कार्य कुशलतेचा योग्य वापर होण्यास मदत होणार आहे.

हे त्यांचे सलग दुसरे शासकीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले पेटंट आहे, तर आदिवासी व दुर्गम भागातील पहिलेच राज्यशास्त्राचे ते संशोधक ठरले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr Mahales second patent published in government journals
Milk Adulteration : दूध भेसळ रोखण्यासाठी प्रोटीन्स तपासणी आवश्यक!

त्यांनी यापूर्वी ‘भारतीय राजकारातील भ्रष्टाचार आणि ते दूर करण्याचे मार्ग’ या विषयावर पहिलेच राज्यशास्त्र विभागाचे पेटंट भारतीय शासकीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहे.

या यशाबद्दल प्रा. महाले यांचे मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले व पदाधिकारी, संस्थेचे सर्व शिक्षणाधिकारी व त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, उपप्राचार्य डॉ. शरद कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले.

Dr Mahales second patent published in government journals
Success Story: ‘माझ्या पोरीनं पांग फेडले गं बाई...’ वंदना शिंदे-गायकवाड यांनी केले कुटुंबीयांच्या श्रमाचे चीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.