प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी, कवयित्री उर्मिला कराड यांचे निधन

Late Urmila vishwanath Karad
Late Urmila vishwanath Karadesakal
Updated on

पुणे येथील माईर्स एमआयटी (MIT) शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी उर्मिला विश्वनाथ कराड यांचे बुधवारी आकस्मिक निधन (Death) झाले. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. सोबतच कवयित्री व लेखिका म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. (Prof Dr Vishwanath Karad wife poet Urmila Karad passed away nashik latest Marathi news)

मूळच्या नाशिकच्या असलेल्या उर्मिला कराड यांचे शिक्षण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातून झाले. १९६४ साली त्यांनी मराठी विषयात बी. ए. (ऑनर्स) ही पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली.

लग्नानंतर त्या लातूर येथील रामेश्वर (रुई) आल्या. त्यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी संपूर्ण वारकरी सांप्रदायाची असल्याने त्यांच्या मनावर संतसाहित्याचा विशेष प्रभाव होता. लहानपणापासून त्यांना काव्य लेखनाची आवड होती. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते.

Late Urmila vishwanath Karad
बिटकॉईनच्या नावावर ठेवी घेतल्याचे भासवून पाऊणेतीन लाखाची फसवणूक

ह.भ.प. संतु राजाराम पाटील हे त्यांचे वडील होते. ते अतिशय विद्वान, निष्ठावंत वारकरी आणि हाडाचे शिक्षक होते. त्यांच्या संस्कारातून त्या घडल्या. लग्नानंतर खेड्यातील वातावरण, घरात सतत माणसांचा राबता, रगाडा आणि कष्टाची कामे यातही त्यांनी त्यांचे कविमन जपले, जोपासले.

त्यांचा पहिला कवितासंग्रह 'समीर' हा १९८९ मध्ये प्रकाशित झाला. पुढे त्यांनी 'अरे संसार संसार', 'अनुभूती', 'माझी माय दुधावरची साय' यासह अनेक लोकप्रिय कवितासंग्रह त्यांनी लिहिले. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी अनेक विषयांवर विपुल लेखन केले.

संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. विविध साहित्य संमेलने, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमातील त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. गेली अनेक वर्षे पंढरपूरची पायी वारी त्या करत असत.

Late Urmila vishwanath Karad
ओझरखेड-वरखेडा रस्त्यावरील अर्धा पुलच गेला वाहून; शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.