Vasant Vyakhyanmala : ठराविक अंतरावर भाषेचा लहेजा बदलतो, तसा तेथील संस्कृती, लोककलाही बदलते. संत परंपरेने समाजाला निष्काम भक्तीची शिकवण दिली. अभंग, भारुड यांनी समाज मनावर मोठा परिणाम केला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर व लोककला यांचा मोठा सहभाग असून, डफलीच्या तालावर अवघा महाराष्ट्र एक झाला असल्याचे मत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी मंगळवारी (ता. २) व्यक्त केले. (professor dr chandanshive statement in Vasant Vyakhyanmala nashik news)
गंगाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सोमवार (ता.१) पासून सुरू झालेल्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेत स्वर्गीय लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृती व्याख्यान डॉ. गणेश चंदनशिवे,
डॉ. प्रकाश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील यशराज कला पथक यांचा ‘रंग शाहिरीचे’ हा कार्यक्रमातून राज्यातील लोककलेला समृद्ध वारसा सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
या वेळी डॉ. चंदनशिवे यांनी भारुडे, लोककलांद्वारे समाजाला जागृत केल्याचे सांगितले. सुरवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. डॉ. गणेश चंदनशिवे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, संगीता बेणी, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, संजय गिते, जयश्री ठाकरे यांच्यासह २०१३ ते २०२३ या काळातील वसंत व्याख्यानमालेचे माजी पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या वेळी श्रीकांत बेणी, प्रा. संगीता बाफना यांच्यासह व्याख्यानमालेचे पदाधिकारी उपस्थित होते. शाहीर विवेक ताम्हनकर आणि त्यांचा चमू महाराष्ट्राची संस्कृती, लोककला यांचे सादरीकरण ‘रंग शाहिरीचे’ या कार्यक्रमातून केले.
यानंतर गणेशवंदना, विठ्ठल गीत, वासुदेव, गौळण, गोंधळ यासारख्या लोककला सादर केल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला नाशिक रोड येथील अभिनव आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘गजर माऊलीचा’ हा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक गायकवाड यांनी, तर सूत्रसंचालन भूषण काळे यांनी केले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
आजचे व्याख्यान
वक्ते- जगप्रसिद्ध बॅगपॅकर प्रवीण मानकर
विषय- बँग पॅकिंगचे भूत पाठीवर घेऊन जगभर फिरा.
रात्री- भूषण कापडणे यांची मराठी हिंदी गीतांची मैफल
वेळ- सायंकाळी सात ते दहा
सुमधुर स्वरांनी निनादला गोदाघाट
संत, महंत आणि महापुरुषांच्या एकापेक्षा एक सरस अशा भक्ती रचना सादर करीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक विक्रम हाजरा यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जयघोषात संपूर्ण गोदाकाठ दुमदुमून गेला.
शताब्दी वर्षाचा शुभारंभप्रसंगी नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनाला विक्रम हाजरा यांच्या स्वरसाधनेने गोदाकाठावर सांयसमयी जणू पाडवा पहाटच अवतरली होती. शुभारंभ कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे यांनी कार्यक्रमाच्या पूर्वीस येऊन शुभसंदेश दिला.
मुंबईच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी रवाना झाल्याने नंतर त्यांचा शुभसंदेश प्रत्यक्ष कार्यक्रमात एव्हीच्या माध्यमातून दाखविला. याप्रसंगी व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष तसेच दिवंगत अध्यक्षांचे वारस यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.