जागतिक कुटुंब दिन विशेष : एकत्र कुटुंबपद्धतीच्या मदतीने साधली प्रगती

जागतिक कुटुंब दिन विशेष - गुलाबसिंग पौलादसिंग तुंवर यांचे १८ सदस्यांचे एकत्र कुटुंब
जागतिक कुटुंब दिन विशेष - गुलाबसिंग पौलादसिंग तुंवर यांचे १८ सदस्यांचे एकत्र कुटुंबesakal
Updated on

झोडगे (जि. नाशिक) : शहरीकरणामुळे नोकरी- व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर होऊ लागल्याने एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होताना दिसत आहे. एकाच छताखाली कुटुंबातील अनेक सदस्य पिढ्यान्‌पिढ्या गुण्या- गोविंदाने नांदणारे आता स्वतंत्र रहाणे पसंत करु लागले आहेत.

१८ सदस्यांचे एकत्र कुटुंब

तर शहरातील फ्लॅट संस्कृतीत पती- पत्नी व दोन अपत्य अशा चौकोनी कुटुंबांची चौकट आता गावाकडील मोठमोठ्या घरात व वाड्यांच्या चौकटीच्या आतही विभक्त कुटुंबपद्धतीने शिरकाव केल्याने भविष्यात एकत्र कुटुंबपद्धती गावातील बोटावर मोजता येतील, एवढेच दिसतील असे चित्र दिसून येत आहे. मालेगाव तालुक्यातील पळासदरे येथील दिवंगत गुलाबसिंग (बापूजी) पौलादसिंग तुंवर यांचे १८ सदस्यांचे एकत्र कुटुंब मात्र त्यास अपवाद आहे.

एकत्र कुटुंबपद्धतीच्या मदतीने साधली प्रगती

एकत्र कुटुंबपद्धती महिलांच्या खंबीर साथीने शेती व्यवसायातून प्रगती साधत राजकारण व समाजकारणातून आपल्या कुटुंबांची ओळख निर्माण करून सामाजिक उन्नतीसह गाव विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बापूजी यांना तीन मुले, सुना व दहा नातवंडे यांच्या मदतीने शेती व्यवसायात एकत्र कुटुंबाच्या (Joint Family) माध्यमातून शेती विकास साधत आर्थिक प्रगती केली.

एकत्र कुटुंब म्हणून ओळख निर्माण केली

आर्थिक प्रगतीमुळे कुटुंबातील तीनही मुले शेती, शेतीपूरक व्यवसाय सामाजिक सहभाग व यातून राजकीय सत्तेत सहभागी होऊन गाव विकासाची धुरा सांभाळत आपल्या कुटुंबांची आदर्श एकत्र कुटुंब म्हणून मालेगाव तालुक्यात ओळख निर्माण केली आहे.

बापूजीनंतर मुलांनी सांभाळली परिवाराची धुरा

अवर्षणग्रस्त भागात शेतीतून समृद्धी साधने अतिशय कठीण होते. मात्र, गुलाबबापूंच्या एकत्र कुटुंबाच्या सदस्यांची मेहनत व कष्ट करण्याची जिद्द असल्याने त्यांच्या तिन्ही मुलांनी बापूजीनंतर परिवाराची धुरा सांभाळली.

शेतीसह समाजकारण व राजकारणाची सूत्रे घेतली हातात

मोठा मुलगा अस्मरसिंग यांनी शेतीसोबत ऊसतोडणी मुकादम म्हणून महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांना ऊसतोडणी कामगार पुरविण्याच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळली. तर दारासिंग (आण्णा) गुलाबसिंग तुंवर यांनी शेतीसह समाजकारण व राजकारणाची सूत्रे आपल्या हातात घेतली. गावचे सरपंच, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, शेतकरी सहकारी संघाच्या माजी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत परिवाराला एकसंघ ठेवले.

एकत्र कुटुंबाची परंपरा ठेवली कायम

शेतीवर अवलंबून न राहता शेतीपुरक व्यवसाय असावा म्हणून ‘वाघेश्‍वरी विट सप्लायर्स’ या नावाने विटभट्टी चालू केली. परिवारातील सर्व मुलांना त्यांनी शिक्षणासाठी बाहेर पाठवले. कुटुंबातील मुले व मुलींनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या एकत्र कुटुंबाच्या परंपरा कायम ठेवली आहे.

प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले

लहाने बंधू संजयसिंग तुंवर हे शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करताना दिसतात. अवर्षणग्रस्त माळमाथ्यावरील खडकाळ जमिनीत बागायती शेती करणे हे दिव्य काम कुटुंबातील सर्वांच्या मदतीमुळे शक्य झाले. येथील लुट्टे धरणावरून पाईपलाईनद्वारे शेतीमध्ये पाणी आणून शेती सिंचनाखाली आणली. ठिबक सिंचन, शेडनेटचा वापर करून कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेणारे व विविध शेतीमध्ये प्रयोग करत आपल्या एकत्र कुटुंबाच्या श्रमाचे मोल जपत आर्थिक उन्नतीसाठीचे महत्व पटवून दिले. शेतीत त्यांची कामगिरी बघून त्यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

जागतिक कुटुंब दिन विशेष - गुलाबसिंग पौलादसिंग तुंवर यांचे १८ सदस्यांचे एकत्र कुटुंब
‘ग्रांथिक विचार’ पुरेसा नाही!

एकत्र कुटुंबाचे फायदे

एकत्र कुटुंबाचा अर्थ फक्त अनेक माणसे एकत्र राहतात असा कधीच नसतो. येथे माणसं खरंच एकामेकांशी जोडलेली असतात. एकमेकांच्या भावना आणि व्यवहारात गुरफटलेली असतात. मुलांच्या वाढत्या वयातील जडण- घडण व त्यांच्यावर होणारे सकारात्मक संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात. एकत्र कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तींकडून लहान मुलांच्या शंकांचे निरस्सन होते. चांगले संस्कार होतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये मानसिक आधार मिळतो.

जागतिक कुटुंब दिन विशेष - गुलाबसिंग पौलादसिंग तुंवर यांचे १८ सदस्यांचे एकत्र कुटुंब
सुखी परिवार, आरोग्याचा आधार...

"कोणतेही कार्य असो अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळामुळे शेती व्यवसायात प्रगती साधता आली. त्यामुळे समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग घेता आला. हे फक्त एकत्र कुटुंबाच्या पाठबळावर शक्य झाले."

- दारासिंग तुंवर, माजी सरपंच, पळासदरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.