Nashik News: जिल्ह्यात 19 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू

Prohibition order in district till January 19 nashik news
Prohibition order in district till January 19 nashik news esakal
Updated on

Nashik News : मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्रात पाणीप्रश्न पेटलेला असताना सुरक्षेचा उपाय म्हणून नाशिक शहर वगळता उर्वरित जिल्ह्यात १९ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले आहेत. (Prohibition order in district till January 19 nashik news)

परभणी येथील ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. २०) गंगापूर धरणाजवळ आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देताच अचानकपणे हे आंदोलन केल्यामुळे पोलिसांसह जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. ‘आप’च्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात अर्धा दिवस गेल्याने अधिकाऱ्यांनी अखेर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली.

त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी लागलीच काढता पाय घेतला. पण जिल्ह्यातील पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता विचारात घेता अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी मंगळवार (ता. २१)पासून ते १९ जानेवारीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार नाशिक शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

Prohibition order in district till January 19 nashik news
Swami Samarth Kendra Extortion case: खंडणीप्रकरणी संशयित महिला कृषी अधिकाऱ्याच्या भावाला अटक

धार्मिक स्थळे, खासगी आस्थापनांना हा आदेश लागू असणार आहे.

बिअरचे कारखाने बंद करा, मगच पाणी सोडा : अंबादास खैरे

मराठवाड्यातील बिअर कारखाने बंद झाल्यानंतरच नाशिकचे पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा विचार करावा, अशी मागणी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज, शेंद्रा, चिकलठाणा, डीएमआयसी करमाड व बिडकीन या औद्योगिक वसाहतीत बिअर कारखाने बंद करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Prohibition order in district till January 19 nashik news
Ramesh Bais: आमच्या शेतीला दिवसा वीज-पाणी द्या; शेतकऱ्यांनी राज्यपालांकडे मांडले गाऱ्हाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.