Prohibition Order : आयुक्तालय हद्दीत 30 मार्चपर्यंत मनाई आदेश

Nashik Commissioner of Police ankush shinde
Nashik Commissioner of Police ankush shinde esakal
Updated on

नाशिक : शहरात येत्या आठवड्यात हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यात सत्ता संघर्षावरुन फूट पडली आहे. तसेच, येत्या ३० मार्चला रामनवमी असून या संभाव्य घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महिनाअखेरपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. (Prohibition order till March 30 in Commissionerate limits nashik news)

शहरात विविध राजकीय पक्ष, संघटना, कामगार संघटना मागण्यांसाठी मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे, उपोषण व आंदोलने करतात. तसेच भाविक धार्मिक सण, यात्रा जत्रा करतात. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था विषयक आयुक्तालय कार्यक्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते.

सध्या विरोधक व सत्ताधारी पक्षात सत्ता स्थापनेवरून पक्षात फूट पडल्याने एकमेकांविषयी आरोप व प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच २२ मार्चला अनंत गोल्फ क्लब मैदानावर सुरेश चव्हाणके यांच्याकडून हिंदू हुंकार सभेचे आयोजन झाले आहे.

गुढीपाडव्यानिमित्त सातपूरला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे. त्याचदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करतात. ३० मार्चला श्रीरामनवमी असल्याने श्री काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी होते. त्याअनुषंगाने आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्त शिंदे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Nashik Commissioner of Police ankush shinde
BJP News : राष्ट्रवादीला धक्का! अमृता पवार भाजपमध्ये

हे टाळा

१६ ते ३० मार्चदरम्यान कोणालाही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, अस्त्रे, गावठी कट्टे, तलवारी, दांडे, काठ्या आणि अन्य प्राणघातक हत्यारे आणि वस्तू बाळगता येणार नाहीत. तसेच कुणाच्याही फोटोचे, प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा पुढाऱ्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करता येणार नाही.

सोबत अर्वाच्य घोषणा, आवेशपूर्ण भाषण करता येणार नाही. वाद्य वाजवू नये, महाआरती, वाहनांवर झेंडे, पेढे वाटणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करता येणार नाही.

जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृहासाठी लागू नाहीत. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.

Nashik Commissioner of Police ankush shinde
Nashik News: म्हाळदे व सायने घरकुल प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी; महानगरपालिका प्रशासनामागे चौकशीचा ससेमीरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.