Nashik : पोलिस आयुक्तालयाकडून शहरात मनाई आदेश लागू

police commissionerate Nashik latest marathi news
police commissionerate Nashik latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी धार्मिक सण- उत्सव, वादग्रस्त विधानांमुळे होणारी निदर्शने, आंदोलनामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी २८ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार मनाई आदेश (Prohibitory orders) लागू केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. (Prohibitory orders imposed in city by Police Commissionerate nashik Latest Marathi News)

येत्या काळात धार्मिक सण- उत्सव आहेत. गुरुवारी (ता. २८) दीप (गटारी) अमावस्या तसेच, २ ऑगस्टला नागपंचमीनिमित्त सोमेश्‍वर, नागचौक व पंचवटी परिसरात भाविकांची होणारी गर्दी, ९ ऑगस्टला मोहरमनिमित्त ताजिया मिरवणूक, तर ११ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने बाजारात वर्दळ असणार आहे.

तसेच, राजकीय बंडाळीमुळे त्याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी, समाजकंटकांकडून उपद्रव होऊ नये यासाठी पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी शहरात पंधरा दिवस मनाई आदेश लागू केले आहेत.

police commissionerate Nashik latest marathi news
10वी, 12वी 17 नंबर फॉर्मची प्रक्रिया उद्यापासून; 24 ऑगस्‍टपर्यंत मुदत

त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही.

आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशारा पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी दिला आहे.

police commissionerate Nashik latest marathi news
काय चाललय पक्षात? : धनुष्यबाणासाठी शिवसेनेची लढाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.