मुळच्या शहापूर येथील आशा मोरे यांना सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने परिस्थितीचा स्वीकार करत तातडीने उपचाराला सुरवात केली. उपचारासाठी नाशिकला प्राधान्य देताना त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली. आज त्या सामान्य जीवन जगत आहेत.
आशा मोरे यांना स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर प्रारंभी अमळनेर येथे डॉ. अनिल शिंदे यांच्याकडे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या सल्ल्याने नाशिकला प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. शैलेश बोंदार्डे यांच्याकडे पुढील उपचार पूर्ण केले. श्रीमती मोरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात असलेली भीती दूर करताना डॉक्टर व रुग्णालयातर्फे समुपदेशन करण्यात आले. नंतर सहा केमो, २५ रेडिएशन थेरपीसह अन्य उपचारही पूर्ण केले.(Project Durga asha more Defeat beast Cancer with Courage Nashik Latest Marathi News)
केमोथेरपी सुरू असताना जेवण घटले होते. मात्र, काहीही झाले, तरी कर्करोगापुढे हार मानायची नाही, असा निर्धार करताना श्रीमती मोरे यांनी उपचारात खंड पडू दिला नाही. उपचार घेण्यासाठी शहापूरहून नाशिकला येण्याचे आव्हान होते. मात्र, डॉ. बोंदार्डे यांच्या सहकार्यामुळे एसटी महामंडळाची विशेष प्रवास सवलत त्यांना मिळाल्याने हा प्रवास सुकर झाला.
अल्पदरात एसटी प्रवास करत त्या नाशिक गाठायच्या व उपचार घेऊन पुन्हा घरी परतायच्या. कुटुंब, मुलाच्या प्रोत्साहनाच्या जोरावर त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली. सध्या त्या दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घेत आहेत व सुदृढ आयुष्य जगत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.