प्रोजेक्‍ट दुर्गा : रविना पिचा यांनी केला कर्करोगाचा सहज पराभव

Ravina Picha
Ravina Pichaesakal
Updated on

उमेदीच्‍या काळात वय अवघे २६ वर्ष असताना स्‍तनाच्‍या कर्करोगाचे निदान झाले. या कठीण प्रसंगात न डगमगता माहेर व सासरच्‍या पाठबळाने रविना पिचा यांनी कर्करोगावर यशस्‍वी मात केली. कर्करोगाचा पराभव केल्‍यानंतर आता जगणे आणखी सुंदर बनले असल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

लग्‍न झाल्‍यानंतर साधारणतः तीन वर्षांनी रविना पिचा यांना स्‍तनाच्‍या कर्करोगाचे निदान झाले. याआधी त्‍यांच्‍या मातोश्रींनादेखील कर्करोगाचे निदान झाले होते. त्यामुळे आईने दिलेले पाठबळ व पती, सासू- सासरे यांच्‍यासह कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍यांनी भक्‍कम साथ देताना त्‍यांना या कठीण प्रसंगातून बाहेर काढले. (Project Durga Raveena Picha defeated Breast cancer easily Nashik Latest Marathi News)

Ravina Picha
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर होणार Electrical Vehicle Charging Point

स्‍तनात छोटीशी गाठ जाणवल्‍यानंतर काही महिन्‍यात वेदना जाणवू लागल्‍या होत्‍या. या वेळी डॉ. प्रमोद शिंदे यांच्‍याकडे तपासणी करताना बायोप्सी करण्यात आली. आवश्‍यक तपासण्या केल्‍यानंतर कर्करोग असल्‍याचे निदान झाले. प्रारंभी डॉ. शिंदे यांच्‍याकडे उपचार घेतल्‍यानंतर उत्तरीय उपचार डॉ. शैलेश बोंदार्डे यांच्‍याकडे घेतले.

आव्‍हानात्‍मक प्रसंगात रडू आले, परंतु इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर पुन्‍हा आयुष्य रुळावर आणण्यात यश आल्‍याचे सौ. पिचा सांगतात. कोरोनाकाळात २०२० मध्ये कर्करोगाचे निदान झाल्‍याने सर्व कुटुंबातील सदस्‍य लॉकडाउनमुळे घरीच बसून होते. या वेळी प्रत्‍येक सदस्‍याने प्रोत्‍साहन देताना नातेवाइकांची ताकद काय असते, हे दाखवून दिले, असे त्‍या सांगतात.

सध्या सर्दी- खोकल्‍याप्रमाणे कर्करोगदेखील सामान्‍य आजार बनला असून, महिलांनी घाबरून जायला नको. जरी निदान झाले तरी योग्‍य उपचार घेत कर्करोगाचा पराभव करता येतो. पुन्‍हा आनंदी, समाधानी जीवन जगता येऊ शकते, असा सल्‍ला त्‍या देतात.

Ravina Picha
Water Conservation : जलदूत दररोज करताहेत 1 लाख 10 हजार लिटर पाण्याची बचत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.