Nashik News: ओझरजवळील अक्राळे औद्योगिक वसाहतीत ‘रिलायन्स’नंतरचा सर्वांत मोठा इंडियन ऑइलचा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पाच्या सुमारे ५० एकरमधील बांधकामाला ‘एमआयडीसी’कडून परवानगी देण्यात आली.
या प्रकल्पामुळे नाशिकच्या औद्योगिक विश्वात भर पडणार असून, रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. (project of Indian Oil is being start in Akrale Industrial Estate nashik news)
इंडियन ऑइलचे सर्वांत मोठे इंजिनिअरिंग वर्कशॉप या ठिकाणी साकारले जात आहे. या प्रकल्पानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनीही भूखंड घेतले असून, कायदेशीर परवानगीसाठी पाठपुरावा केला जातो. दिवाळीपूर्वी व नंतर २५ पेक्षा छोट्या-मोठ्या लघुउद्योगांनीही प्रत्यक्षात बांधकामाला सुरवात केल्याचे पाहायला मिळाले आहे.
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘निमा’च्या ‘मेक इन नाशिक’अंतर्गत दिंडोरीत अनेक उद्योगांनी आपल्या विस्तारासाठी जागेची मागणी केली आहे. अक्राळे येथे उद्योग उभारणीस प्राधान्य दिले जात असून, जिल्ह्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे वाटचाल करीत असलेल्या अक्राळे औद्योगिक वसाहतीला उद्योजक प्राधान्य देत आहेत.
अक्राळे वसाहतीला लागून हाकेच्या अंतरावर ओझर येथील विमानतळ तसेच गुजरात महामार्ग आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग दृष्टिपथात आहे. यामुळे देशांतर्गत दळणवळणाच्या मोठ्या सुविधा निर्माण होणार आहेत. रिलायन्स ग्रुप, इंडियन ऑईलसह कृषी प्रक्रिया उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा ओढा याच औद्योगिक वसाहतीकडे वाढला. यामुळे जिल्ह्यातील नव्हे, तर राज्याच्या अर्थचक्राला गती मिळणार आहे.
या औद्योगिक वसाहतीत वर्षभरापासून ‘रिलायन्स’च्या फार्मा क्षेत्रातील सर्वांत मोठ्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यात ३०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करीत इमारत बांधकामाला ‘एमपीसीबी’ व ‘एमआयडीसी’ने परवानगी दिली. त्यानंतर दिवाळीपूर्वी इंडियन ऑइलला २२ नोव्हेंबर २००२ ला परवानगी देण्यात आली. या कंपनीनेही सुमारे ५० एकरच्या भूखंडावर पहिल्या टप्प्यातील सुमारे ७४ हजार ८१० चौरस मीटर बांधकामाच्या परवानगीचा प्रस्ताव सादर केला होता.
‘रिलायन्स’नंतर आता इंडियन ऑइल
रिलायन्स फार्माला प्लॉट क्रमांक बी १०८ चा चार लाख २६ हजार ८३० स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर एक लाख ९५ हजार ६३६ स्क्वेअर मीटरच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला प्लॉट क्रमांक बी १०९ हा ५० एकरचा भूखंड देण्यात आला. त्यावर ७४ हजार ८१० स्क्वेअर मीटर बांधकामाचा आराखडा कंपनीने सादर केला होता. सध्या त्यावर बांधकाम सुरू झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.