Nashik News : पाणी नाही म्हणून आश्रमशाळा बंद नाही : प्रकल्प अधिकारी जितीन रहेमान

aashram school
aashram schoolesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील काही आश्रमशाळांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असली तरी त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यात कोणताही व्यत्यय नाही. पिण्याच्या पाण्याचा शाळांच्या कामकाजावरही कुठलाही परिणाम होऊ दिलेला नाही.

देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर ) येथील आश्रमशाळेबाबत पसरविण्यात येत असलेले वृत्त निराधार, तथ्यहीन आहे असे स्पष्टीकरण आदिवासी विकास विभागाचे नाशिकचे प्रकल्प अधिकारी जितीन रहेमान यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिले. (Project Officer Jithin Rahman statement Ashram school not closed due to lack of water nashik news)

देवगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी पुरत नाही, म्हणून मुलींच्या आश्रमशाळेला सुट्टी देण्यात आल्याचे वृत्त काही संघटनांनी आज सोशल मिडियासह वृत्तपत्रांकडे दिले आहे.

त्याबाबत श्री. रहेमान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरीलप्रमाणे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी अशा वृत्ताला बळी पडू नये, वाटल्यास माध्यम प्रतिनिधी, तसेच कुणीही त्या आश्रमशाळेवर जाऊन चौकशी करू शकतात असेही ते म्हणाले.

पाण्याअभावी ही आश्रमशाळा बंद करण्यात आल्याचे एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी माध्यमांना सांगितले,मात्र ते वृत्त तथ्यहीन असल्याचे रहेमान यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

aashram school
Maha Online Portal : महाऑनलाइन पोर्टलचे काम 8 दिवसांपासून विस्कळित

देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथे आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रमशाळा आहे. तेथे पहिली ते बारावीपर्यंत मुली शिक्षण घेत आहे.

या शाळेला वैतरणा धरणातून स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे. धरणाचा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी कमी झाले आहे. मात्र पाण्याची कमतरता भासू नये यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

"पिण्याचे पाणी नाही म्हणून कोणतीही आश्रमशाळा बंद करण्यात आलेली नाही. ज्या आश्रमशाळांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. संघटनेने केलेला आरोप तथ्यहीन आहे." - जितीन रहमान, प्रकल्प अधिकारी, नाशिक, आदिवासी विभाग.

aashram school
Kharif Season : खरीप पेरणीचे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट; सोयाबीनच्या पेरणीची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.