नाशिक : पुणे- नाशिक रेल्वे मार्ग, महापालिकेची सिटीलिंक बससेवा व प्रस्तावित टायर बेस मेट्रो प्रकल्प या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या तिन्ही ट्रान्स्पोर्टचे जंक्शन एकाच मल्टी मॉडेल हबमध्ये समावेश करण्याच्या प्रकल्पाला चालना देण्यासाठी आज एक पाऊल पुढे पडले. महापालिका आयुक्तांसह महरेल व मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मल्टी मॉडेल हबच्या जागेची संयुक्त पाहणी केली. (Promoting Multi Model Hub with Metro Neo Inspection at Sinnar Phata area by NMC Commissioner Nashik Latest Marathi News)
आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नाशिक रोड येथील नियोजित मल्टी मोडल हब संबंधित प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निओ मेट्रो, नाशिक- पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे लाईन (महारेल) आणि सिटीलिंक या तिन्ही कंपन्यांचे एकत्रित प्रकल्प इथे असणार आहेत. पॅसेंजर टर्मिनल, बस डेपोही मल्टी मॉडेल हबमध्ये राहतील.
नाशिक रोडला सिन्नर फाट्याजवळ १६ एकरात प्रकल्प साकार केला जाणार आहे. मल्टी मॉडेल हब विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून आयुक्तांनी ही पाहणी केली. निओ मेट्रो, महारेल आणि सिटीलिंक या तिन्ही कंपन्यांमध्ये समन्वय राहावा, एकत्रित नियोजन व्हावे या दृष्टीने आयुक्तांनी पाहणी करून तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
या वेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सुनील रौंदळ, उपअभियंता नीलेश साळी, महारेलचे अशोक गरुड, पराग घोलप, महामेट्रोचे विकास नागुलकर आदी अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.