Property Tax Recovery : जिल्ह्यात 71 टक्के घरपट्टी वसुली; सिन्नर, देवळा आघाडीवर

property tax
property taxesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात गतवर्षीच्या थकबाकीसह घरपट्टी वसुलीचे ९९ कोटी ९९ लाख सात हजार १९९ रुपये उद्दिष्ट असताना फेब्रुवारीअखेर यापैकी ७६ कोटी २० लाख ९४ हजार ९७५ रुपये म्हणजेच ७०.४० टक्के वसुली झाली असून, ३२ कोटी तीन लाख ६५ हजार २५० रुपये अर्थात, २९.६० टक्के वसुली अद्याप बाकी आहे. (Property Tax Recovery 71 percent house tax recovery in district Sinner Deola in lead nashik news)

यामध्ये सर्वाधिक वसुली ही देवळा व सिन्नर तालुक्यांत झाली, तर सर्वांत कमी वसुली इगतपुरी तालुक्यात झाली आहे. दरम्यान, घरपट्टी वसुलीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

साधारणः दर वर्षी होणारी ९५ टक्के वसुली बघता, हे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे ग्रामपंचायत विभागाकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात १५ तालुक्यांत एक हजार ३८२ ग्रामपंचायती आहेत. ३१ मार्चअखेर या ग्रामपंचायतींमधून ९९.९९ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

यापैकी फेब्रुवारीअखेर ७६ कोटी २० लाख ९४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. निफाड तालुक्यातून सुमारे १६ कोटी पाच लाख रुपये वसुली अपेक्षित होती. त्यापैकी आतापर्यंत दहा कोटी ८० लाखांची वसुली करण्यात ग्रामपंचायतींना यश आले आहे.

त्यापाठोपाठ दिंडोरी, नाशिक, इगतपुरी येथे प्रत्येकी ११ कोटी, तर मालेगाव येथे ८.२० कोटी रुपयांच्या वसुलीची मागणी आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये ‘एमआयडीसी’चा भाग असून, शहरांपासून जवळ अंतर असल्यामुळे घरांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे या तिन्ही तालुक्यांतून करांमधून ग्रामपंचायतींना अधिक उत्पन्न मिळते. आतापर्यंत सर्वाधिक २.९६ कोटी रुपयांची करवसुली ही देवळा तालुक्यात झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील वसुलीचे प्रमाण सुमारे १२३ टक्के आहे.

त्यापाठोपाठ सिन्नर- १०४ टक्के, चांदवड- ८६.८२ टक्के, येवला- ७५.४०, कळवण- ७२.७२ टक्के, तर सुरगाणा तालुक्यात ७१ टक्के वसुली झाल्याचे ग्रामपंचायत विभागातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

property tax
Nashik News : ZP ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सावळागोंधळ! एकाच अभियंत्यांकडे तीन-तीन विभागांचा पदभार

तालुकानिहाय स्थिती अशी (कोटी रुपये)

तालुका वसुली थकबाकी

निफाड १६,०५,५९,९८२ ०६,४४,४९७५

त्र्यंबकेश्‍वर ०४,२४,४५,५३४ ०१,९२,४८,१२८

बागलाण ०६,९८,२८,२४१ ०३,२९,४७,७९७

इगतपुरी ११,८०,५३,०४६ ०५,७५,९५,८३०

नाशिक ११,५७,२२८ ०५,४६,६४,७४०

दिंडोरी ११,६४,८०,८६९ ०४,९८,३८,५२१

नांदगाव ०१,९२,६६,७११ ०१,०७,९८,१२७

पेठ ०१,५०,७९,१०९ ६०,५७,०२५

येवला ०२,६९,१५,९३२ ७०,८७,८००

मालेगाव ०८,२०,२८,८५८ ०२,८४,१३,८८७

सुरगाणा ०२,२२,२२,२०७ ७२,३९,७३८

कळवण ०१,९६,८५,३७७ ६०,८७,८४०

चांदवड ०४,४७,६१,७१७ ६१,८७,८०१

सिन्नर १२,४२,३०,८६६ -५५,४२,०२५

देवळा ०२,२६,४८,५२२ -५६,०३,८७४

property tax
Market Committee Election : लासलगाव, मनमाडमध्ये 30 एप्रिलला मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.