नाशिक : गुजरात सीमावर्ती भागातील सुरगाणा गावातील ५५ हून अधिक गावांना मुलभूत सुविधा विशेषः स्मशानभूमी नसल्याने या गावांनी गुजरात राज्याला जोडण्याची मागणी केली. जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधातंर्गत स्माशनभूमीसाठी निधी दिला जाईल असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
त्यानुसार, प्रशासनाकडे १२२ गावांना स्माशनभूमी नसल्याचा प्रस्ताव दाखल झाला. मात्र, प्रत्यक्षात जनसुविधातंर्गत केवळ २२ स्माशनभूमीसाठी एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहेत. त्यामुळे सुरगाणा तालुक्यातील १०० गावातील स्माशनभूमीसाठी पुन्हा एकदा निधीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. (proposal filed administration for 122 crematorium reality fund sanctioned for only 22 crematories under public facilities nashik news)
दुसरीकडे जनसुविधातंर्गत जिल्हयातील १५ तालुक्यासाठी ४२.३३ कोटींच्या ४२८ कामांना प्रशासकीय मान्यता देणअयात आली आहे. यात पालकमंत्री भुसे यांच्या मालेगावला झुकते माप देण्यात आले आहे. जिल्ह्यात ४६१ गावे-पाड्यांना स्मशानभूमी नसून त्यातील १२२ गावे सुरगाणा तालुक्यातील आहेत.
मुलभूत सुविधा मिळत नसल्याने सुरगाणा तालुक्यातील ५५ हून अधिक गावांना गुजरात राज्याला जोडण्याची मागणी केली आहे. यात गावांमध्ये स्माशनभूमी नसणे हे देखील महत्वाचे कारण होते. जनसुविधातंर्गत कामे मंजूर करताना सुरगाणा तालुक्यात २२ स्माशभूमीसाठी एक कोटी ७० लाखांचा निधी दिला आहे.
त्या तुलनेत पालकमंत्री भुसे यांच्या मालेगावला ६५ स्माशनभूमीसाठी ४ कोटी ९५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. साधारण स्माशनभूमी तथा स्माशनभूमी अनुषंगिक कामे यासाठी सरासरी १० लाख तर, काही स्माशनभूमीसाठी १५ लाख, ७ लाख व ५ लाख याप्रमाणे निधी मंजूर झालेला आहे.हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
तालुकानिहा मंजूर स्माशनभूमी
नाशिक (२१), सुरगाणा (२२), इगतपुरी (२९), त्र्यंबकेश्वर (११), पेठ (६), दिंडोरी (३६), कळवण (२७), बागलाण (४४), देवळा (१९), चांदवड (२३), मालेगाव (६५), नांदगाव (२४), येवला (३१), निफाड (४२), सिन्नर (२७).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.