Nashik News : घरबसल्या करता येणार शासनाच्या दाखला मागणीचा प्रस्ताव सादर ! या संकेतस्थळावर करा अर्ज

Aaple Sarkar Portal News
Aaple Sarkar Portal Newssakal
Updated on

Nashik News : राज्य शासनाने नुकतीच ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ अर्थात 'फिफो ही प्रणाली हाती घेतली आहे. त्यामुळे घरबसल्या शासनाच्या वेबसाइटवर दाखला मागणीचा प्रस्ताव सादर करता येणार आहे.

शिवाय ठरलेल्या वेळेत दाखला हाती पडणार आहे. दिंडोरी तालुक्यात फिफो प्रणालीची अंमलबजावणी सुरु झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (proposal for certificate can be submitted on government website at home by fifo system nashik news)

महसूल विभागाकडून सेतू कार्यालय, आपलं सरकार सेवा पोर्टलद्वारे नागरिकांना शैक्षणिक काम व नोकऱ्यांसाठी विविध दाखले दिले जातात. तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या स्वाक्षरी व शिक्क्याने हे दाखले वितरित होता. सर्वप्रकारचे दाखले ऑनलाइन काढून दिले जात असले तरी 'सेटिंग्ज लावली जाते.

मग ते जात प्रमाणपत्र असो अथवा उत्पन्नाचा दाखला, दलाल प्रवृत्तीमुळे रांगेत असणाऱ्यांची कामे होत नाहीत. दलाल प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्यात 'फर्स्ट इन फर्स्ट आउट' म्हणजेच फिफो प्रणाली वापरण्याचा निर्णय महाआयटीकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे.

या प्रणालीमुळे आता प्रमाणपत्र मिळणे सोयीचे होणार आहे. शिवाय सामान्य नागरिकांची दलाल प्रवृत्तीमधून सुटका होण्याची अपेक्षा देखील वर्तवण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रथम अर्ज करण्यात आलेल्या व्यक्तीचे काम आधी करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्हयात ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यात देखील त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Aaple Sarkar Portal News
Social Media Precaution : सावधान! सोशल मीडियावर अतिउत्साहाने व्यक्त होऊ नका.... नाहीतर

काय आहे 'फिफो' प्रणाली...

फिफो प्रणालीमुळे ज्याचा अर्ज आधी आला त्यालाच योग्य पडताळणीनंतर दाखला दिला जाईल. अर्ज निकाली काढण्यासाठी डेस्क कारकून, अव्वल कारकून किंवा नायब तहसीलदार व त्यानंतर तहसीलदार अशी यंत्रणा असते.

फिफो प्रणालीनुसार तारीख आणि वेळेनुसार प्रथम अर्ज करणाऱ्यांचाच अर्ज स्वीकारला किवा नाकारला जाईल. फिफो प्रणालीमुळे कुणालाही अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही.

हे दाखले मिळणार आनलाईन

रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, ज्येष्ठ नागरिक, अल्पभूधारक अशा विविध १५ प्रमाणपत्रांसाठी कालावधी ठरवून देण्यात आला आहे. यासाठी आकारण्यात येणारे शुल्क देखील ठरवून देण्यात आले आहे. त्याची माहिती प्रत्येक सेतू कार्यालयात लावण्यात आली आहे.

Aaple Sarkar Portal News
ZP Super 100 Exam : जिल्हा परिषदेकडून ‘सुपर 100’ साठी या तारखेला परिक्षा

शासनाने https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ही प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. यामुळे दाखले वितरणाच्या कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता येणार असल्याचा दावा केला जात आहे.

"फर्स्ट इन फर्स्ट आउट' (फिफो) प्रणालीने निश्चितच गैरप्रकाराला आळा घालणे शक्य होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे, सर्व सामान्य माणसाचे काम लवकर मार्गी लागेल." - पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी.

"फिफो प्रणालीने विविध दाखल्यांचा नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुलभ झाली आहे. फक्त सर्व्हर डाऊन, विद्युत पुरवठा खंडीत होण्याची समस्या असू शकते. नागरिकांनी आपले दाखले वेळीच काढून घ्यावीत." -विकास दशपुते, आपले सरकार सेवा केंद्र वणी.

Aaple Sarkar Portal News
Malegaon MSG College : धर्मप्रचार प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.