इगतपुरी-मनमाड सेमी हायस्पीडसाठी प्रस्ताव : पालकमंत्री भुजबळ

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on
Summary

नाशिक-पुणे-नगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा आहे. प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे या तिन्ही जिल्ह्यांतील कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे.

नाशिक : नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-नगर या तिन्ही जिल्ह्यांबरोबर इगतपुरी ते मनमाड सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.


भुजबळ म्हणाले, की रेल्वेमार्गासाठी एक हजार ६३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तिन्ही जिल्ह्यांतून १०१ गावांमध्ये एक हजार ३०० हेक्टर भूसंपादन होईल. जमीन संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार मोबदला देण्यात येईल. भूसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, नाशिक-पुणे-नगर हा महाराष्ट्रातील औद्योगिक व कृषी विकासाचा संपन्न पट्टा आहे. प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेमुळे या तिन्ही जिल्ह्यांतील कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर थेट वाटाघाटीतून जमिनीचे संपादन होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक-पुणे रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.
(proposal will be submitted to start Igatpuri Manmad semi high speed railway line said Chhagan Bhujbal)

chhagan bhujbal
नाशिकमध्ये लॉकडाउनचे निर्बंध शिथिल; जाणून घ्या काय सुरू काय बंद?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.