नाशिक : विनयनगर येथे १३ एकर भूखंडावर बिनशेती परवानगी न घेता तसेच ले- आउट मंजूर नसताना बांधकाम सुरू असून, विशेष म्हणजे तयार झालेल्या घरांना महापालिकेने नळजोडणी देण्याबरोबरच या भागात पायाभूत सुविधा पुरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाने कारवाई करणे अपेक्षित असताना उलट सुविधा पुरवून अनधिकृत घरांना संरक्षण देण्याचे उद्योग चालवले आहे. यात स्थानिक लोकप्रतिनिधींचादेखील सहभाग असल्याचे बोलले जात आहे. (Protection of unauthorized constructions by Municipal Corporation Nashik Latest NMC News)
नाशिक शिवारातील विनयनगर येथे सर्व्हे क्रमांक ८६६/१/१ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत मोठ्या वसाहतीचे बांधकाम चालू आहे. सदर भूखंड कच्ची जमीन अर्थात शेतीचे बिनशेती मध्ये रूपांतर न करता तसेच ले- आउट मंजूर नसताना प्लॉट पाडून बेकायदेशीररीत्या विक्री करून जमिनीच्या व्यवहाराबद्दल माहिती नसलेल्या नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
इनामी प्रकारच्या या जागेवर पक्के बांधकाम चालू आहे. या संदर्भात महापालिकेने भूखंडावर चालू असलेल्या बांधकामांना नोटीस बजावली, मात्र हा फक्त कागदोपत्री सोपस्कार ठरला. अनधिकृत बांधकाम संदर्भात तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती.
श्री. पवार यांनी तातडीने कारवाईच्या सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या. अतिक्रमण विभागाने पूर्व विभागाशी संपर्क साधला, मात्र तोही सोपस्कार ठरला. स्थानिक पातळीवर दाद मिळत नसल्याने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विनयनगर रहिवासी संघातर्फे निवेदन देण्यात आले.
आंधळ दळतयं
परवानगी न घेता या भागात शेतजमिनीवर बांधकाम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी तक्रार करून दखल घेतली नाही. मात्र, दुसरीकडे येथील घरांना पाणीपुरवठा, रस्ते आदी आकाराच्या सुविधा पुरविल्या जात असल्याचे प्रकार समोर येत असल्याने ‘आंधळ दळतय’ अशीच अवस्था महापालिका प्रशासनाच्या बाबतीत दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.