Milk Adulteration : दूध भेसळ रोखण्यासाठी प्रोटीन्स तपासणी आवश्यक!

पारंपरिक पद्धतीने होणारी एसएनएफ, फॅट्स तपासणी भेसळखोरांच्या पथ्यावर
adulteration in milk
adulteration in milkesakal
Updated on

Milk Adulteration : दुधाला आपण अमृत मानतो. हे अमृत भेसळीच्या माध्यमातून नासवले जात आहे. दुभत्या जनावरांपासून काढलेले धारोष्ण दूध सर्वर्थाने शुद्ध आणि पोषक असते. दूध उत्पादक शेतकऱ्यापासून ते घराच्या उंबऱ्यापर्यंत पोचविणाऱ्या किरकोळ वितरकापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर दुधात भेसळ करण्यास वाव आहे. तशी भेसळ अनेक ठिकाणी सुरू आहे. (Protein inspection necessary to prevent milk adulteration Conventional SNF Fats inspection on adulterants route nashik)

दुधातले केवळ एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) आणि फॅट्स किंवा डिग्री तपासून संकलन केंद्रांत शेतकऱ्यांकडून दूध स्वीकारले जाते. तेथे पाणी मिसळल्यामुळे दुधाची घनता वाढविण्यासाठी त्यात युरिया, ग्लुकोज (साखर), दुधाची भुकटी, लॅक्टो आदी घटक मिसळले जातात.

स्निग्धांश वाढविण्यासाठी त्यात गोडेतेल किंवा डालडाही मिसळला जातो. अलीकडच्या काळात कास्टिक सोडा, कपडे धुण्याच्या साबणाचा चुरा, सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रॉक्साइडसारखी घातक रसायने वापरून दुधात भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे.

दुधातली भेसळ पाण्यापुरती मर्यादित होती, तोपर्यंत फार धोका नव्हता. त्याव्यतिरिक्तच्या भेसळीमुळे आतड्याचे कॅन्सर, त्वचारोग होण्याची भीती बळावली आहे. परदेशात गाई, म्हशींचे दूध काढण्यापासून ते पिशवीबंद करण्यापर्यंची सगळी प्रक्रिया यांत्रिक असते.

गावातल्या घराघरांतून दूध संकलन होते. त्यामुळे कोण काय भेसळ करतो, हे शोधणे अशक्य होते. परदेशात दर्जाचे निकष प्रोटीन्सवर आधारभूत असतात. दुधात भेसळ केल्यानंतर कृत्रिम पध्दतीने प्रोटीन्सचे प्रमाण वाढवता येत नाही.

आपल्याकडे दुधाचा दर्जा तपासताना भेसळीस पुरेपूर वाव असलेले एसएनएफ, फॅटस किंवा डिग्री निकष लावले जातात. प्रोटीन्सचा निकष लावला, तर भेसळ लपविणे अवघड आहे. मात्र, ही तपासणी खर्चिक आहे, या एकाच कारणास्तव पारंपरिक निकष बदलले जात नाहीत.

त्याचा फायदा भेसळखोर घेतात. ग्रामीण भागात दूध संकलन केंद्रांमध्ये दूध भेसळ करणाऱ्या प्रवृत्तीच्या सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संकलित केलेले दूध एखाद्या खासगी अथवा सहकारी संस्थेला पुरविले जाते.

त्यासाठी संबंधित संस्थेचे वाहन ठराविक वेळ देऊन दूध संकलन केंद्रात जमा झालेले दूध घेऊन जाते. याच टप्प्यावर भेसळखोर आपला कार्यभाग साततात. एका वाहनांमध्ये सात ते दहा ठिकाणचे दूध एकत्र जमा होते आणि ते संबंधित संस्थेच्या प्लांटवर पोहोचवले जाते.

त्यामुळे नेमके कोणत्या दूध संकलन केंद्रातून भेसळीचे दूध आले हेही समजत नाही. आणि हीच मेख हेरून भेसळखोर जनतेच्या जीवाशी खेळत आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

adulteration in milk
Milk Adulteration: गरज दूध भेसळीच्या तळापर्यंत जाण्याची; पोलिसांच्या सिन्नरमधील कारवाईचे सामान्यजणांकडून स्वागत

कठोर दंडाची तरतूद आवश्‍यक

संकलन केंद्रांवर येणारे भेसळयुक्त दूध तिथेच नाकारले किंवा भेसळ असल्याने कठोर दंडाची तरतूद केली तरच भेसळीवर अंकुश निर्माण करणे शक्य आहे. परदेशात एक मिली दुधात एक लाखांपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतील, तर ते दूध नाकारले जाते.

महाराष्ट्रात मात्र तो निकष ५ ते १५ लाख बॅक्टेरिया इतका प्रचंड आहे. ते प्रमाण कमी करून जास्तीत जास्त आरोग्यदायी वातावरणात दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

दूध उत्पादकांची मोठी व्होट बँक दुखावण्याची ताकद स्थानिक राजकारण्यांमध्ये नाही. सरकारी यंत्रणांनी कारवाई करायची ठरवली, तरी त्यांचे हात बांधले जातात.

गुन्हा अजामीनपात्र होणे आवश्यक

अनेक दूध उत्पादक संघ किंवा सहकारी संस्था नेत्यांच्याच आहेत. दूध कंपन्यांमध्येही त्यांची अप्रत्यक्ष भागिदारी आहे. त्यामुळे तिथून होणाऱ्या भेसळीवरही कुणाचाही अंकुश नाही.

दूध भेसळीसारख्या गुन्ह्यांसाठी अन्नसुरक्षा कायद्यात केवळ सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. त्यातही भेसळ पकडली म्हणजे शिक्षा होईलच असे नाही. हा गुन्हा जामिनपात्र असल्यामुळे संशयित सुटतात.

पुढे पोलिसांना सादर केलेले साक्षी पुरावे कोर्टासमोर न टिकल्याने या गुन्ह्यातील संशयितांची निर्दोष सुटका होते. त्यामुळे कायद्याचे कुणाला भयच राहिले नसून सर्वप्रथम हा गुन्हा अजामीनपात्र होणे आवश्यक आहे.

भेसळयुक्त दूध आरोग्यास अपायकारक

भारतीय औषध प्रमाणित संस्थेनुसार भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांमुळे कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात. युरियाच्या अतिवापरामुळे, सेवनामुळे मूत्रविकार जडू शकतात. हृदयास व फुफ्फुसासही हानिकारक ठरू शकते.

सोड्याच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये वाढीस असणारे प्रथिनांचे (लायसीन) प्रमाण कमी होते यामुळे त्यांच्या शरीरवाढीवर विपरीत परिणाम होतात.

adulteration in milk
Milk Adulteration News : गुजरातहून येणाऱ्या दुधाची तपासणी; मोबाईल टेस्टिंग व्हॅनच्या माध्यमातून धडक मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.