Nashik News : शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी नाशिक जिल्हा बँक थकबाकीदार शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र खेडलेझुंगे येथून अन्नत्याग पायी दिंडीची सुरवात केली आहे.
खेडलेझुंगे येथील ग्रामदैवत वैकुंठवासी योगीराज तुकारामबाबा यांच्या चरणी लीन होऊन निफाड तालुक्यातून शेतकरी संघर्ष यात्रेला सुरवात झाली. (protest against agricultural policies by farmers association nashik news)
कांद्याच्या माळा गळ्यात घालून राज्य व केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत घोषणा देण्यात आल्या.
शेतकरी हिताचे धोरण न स्वीकारणाऱ्या शासनाविरोधात घोषणा देऊन शासनाला जाग आणण्यासाठी या मोहिमेची सुरवात केली आहे अशी माहिती ललित बहाळे यांनी दिली. शेतकरी हिताच्या गोष्टींना प्राधान्य देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी अन्नत्याग दिंडीला पाठिंबा दिला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खेडलेझुंगे येथे ललित बहाळे यांचा सत्कार करण्यात आला.
महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा निर्मला जगझाप, शेतकरी संघटनेचे पाईक संधान, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, बाबासाहेब गुजर, त्र्यंबक चव्हाणके, बाजीराव कोकाटे, एकनाथ गीते, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर, संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब तासकर, रामदास गवळी, सागर गवळी, ज्ञानेश्वर गायकवाड, रामकृष्ण बोंबले, ज्ञानेश्वर तासकर आदी पदाधिकाऱ्यांनी या संघर्षयात्रेत सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.