Nashik News : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिंदे गावात ड्रग्जचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर नाशिकमध्ये राजकारण सुरू झाले आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक आमदाराचा हात असल्याचे सांगितल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली तर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचा या प्रकरणात उल्लेख केल्याने त्याचे पडसाद आंदोलनाच्या रूपात उमटले. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. (Protest against Sushma Andhare jodo maro andolan MD case turn Political Nashik News)
ठाकरे गटाचे नेत्यांबरोबर ललित पाटील यांचे काही संबंध आहेत का, याची चौकशी करून उत्तर द्यावे. असे आव्हान देत पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरुध्द कोणताही पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी नाशिककरांची माफी मागावी, अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी या वेळी केली.
याप्रसंगी महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सुवर्णा मटाले, अस्मिता देशमाने, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, महेश जोशी, शशिकांत कोठुळे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभाप्रमुख बाबूराव आढाव, रोशन शिंदे, प्रताप मेहरोलिया, दीपक मौले, नगरसेवक सूर्यकांत लवटे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, उमेश चव्हाण, अरुण घुगे, अमोल जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, अंबादास जाधव, आदित्य बोरस्ते, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण पडोळ, शुभम पाटील, भिवानंद काळे, युवराज मोरे, आकाश पवार, सागर बोरसे, कैलास जाधव, विलासराव गायकवाड, शिवा जोशी, तुषार गिरी, ज्योती फड, अनिता पाटील आदी उपस्थित होते.
"पुरावा नसताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याने सुषमा अंधारे यांनी नाशिककरांची जाहीर माफी मागावी. या उलट ठाकरे गटाच्या नेत्यांबरोबर ललित पाटीलचे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत. ठाकरे गटाचे नेते व पाटील यांच्यात काय संबंध आहेत, याबाबतही अंधारे यांनी उत्तर द्यावे."- अजय बोरस्ते, जिल्हाध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.