Sharad Pawar : शरद पवार गटाकडून काळ्या फिती लावून निषेध

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेल्या शरद पवार गटाने बुधवारी (ता.७) काळ्या फिती लावून निवडणूक आयोगाचा निषेध नोंदविला.
Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Updated on

Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेल्या शरद पवार गटाने बुधवारी (ता.७) काळ्या फिती लावून निवडणूक आयोगाचा निषेध नोंदविला.

निवडणूक आयोग सत्तारूढ पक्षाच्या हातचे बाहुले असून आयोगाने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप प्रदेश उपाध्यक्ष गोकूळ पिंगळे व शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. (Protest by Sharad Pawar group wearing black ribbons nashik news)

शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात बुधवारी (ता.७) झालेल्या पत्रकार परिषदेत पिंगळे व शेलार बोलत होते. शहराध्यक्ष शेलार म्हणाले, की सत्तारूढ भाजपच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग व इतर सर्वच शासकीय यंत्रणांकडून विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाबाबतही निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारचा निर्णय दिला जाईल, याची पूर्वकल्पना पक्षाला होती.

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांची बी टीम असून सतत चुकीचे निर्णय आयोगाकडून दिले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. विरोधी पक्षांना सापत्नपणाची वागणूक आयोगाकडून दिली जात आहे. त्यामुळेच ईव्हीएमबाबतही विरोधकांना वेळ देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawar: Devendra Fadnavis यांची राष्ट्रवादीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया

‘ईव्हीएम हटाव’ साठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे यापेक्षा वेगळा पक्षपातीपणाचा निर्णय आयोगाकडून घेतला जाईल, याची अपेक्षाही नव्हती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडूनच आता न्याय मिळू शकेल, असा विश्वासही पिंगळे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस सुरेश दलोड, मुन्ना अन्सारी, अनिता दामले, भावणेश राऊत, राजेंद्र पवार, सागर बेदरकर, प्रवीण नागरे आदी उपस्थित होते.

अजित पवार गटाला होर्डिंगमधून प्रत्युत्तर

दरम्यान, शरद पवार गटाकडून अजित पवार गटाला होर्डिंगमधून प्रत्युत्तर देण्यात आले. निवडणूक आयोगाचा काळ्या फिती लावून निषेध करताना शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर गोकूळ पिंगळे यांनी होर्डिंग लावले.

निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे ‘हातातील घड्याळ सोडाल पण लोकांशी बांधलेली नाळ कशी तोडाल?, अशा आशयाचा फलक पिंगळे यांनी मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयासमोर उभारला होता. या होर्डिंची एकच चर्चा शहरात दिवसभर होती.

Sharad Pawar
Sharad Pawar on Nehru: PM मोदींनी नेहरुंवर केलेल्या टीकेला शरद पवारांचं उत्तर; म्हणाले, योगदान नाही हा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.