Nashik News : राज्यातील सुमारे ६२ हजार जिल्हा परिषद शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या शासन निर्णय विरोधात तसेच कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करू नये, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देता केवळ अध्यापनाचे काम द्यावे, या मागण्यांसह प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने महाआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांचे नेतृत्वात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळेतील शिक्षकांनी या महाआक्रोश मोर्चामध्ये सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख प्रदीप शिंदे यांनी केले आहे. (Protest march on behalf of Maharashtra State Primary Teachers Association against contract teacher recruitment Nashik)
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये ३ ते १४ वयोगटातील सर्व मुला -मुलींना दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे.
मात्र शासन या जबाबदारीपासून दूर पळण्याचे काम करत असून खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या गोंडस नावाखाली राज्य शासन शिक्षणाचे खासगीकरण करत आहे.
शिक्षक भरती देखील कंत्राटी पद्धतीने करून देशातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा हक्क शासन हिरावून घेण्याचे काम करत आहे. शिक्षकांवर ७५ पेक्षा जास्त अशैक्षणिक कामाचा बोजा टाकून शासन शिक्षकांना अध्यपनापासून दूर करत आहे.
त्यामुळे सरकारी शाळा बंद पाडण्याचा हा डाव आहे. यापूर्वी शासनाने विमान कंपन्या, जहाजे, दूरसंचार यंत्रणा, महसूल, आरोग्य यामध्ये खासगीकरणाचा शिरकाव केलेला असून शिक्षण क्षेत्रात देखील खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
केरळ सरकार गुणवत्ता पूर्ण विकास उपक्रम राबवून त्यांच्या राज्याला वेगळ्या उंचीवर नेत असतानाच आपल्या राज्यात मात्र शिक्षणाचे खासगीकरण होत आहे.
या निर्णयास विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संपर्क प्रमुख प्रदीप शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.